शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी जितेंद्र पाटील यांची नेमणूक

 शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी जितेंद्र पाटील यांची नेमणूक

गणपूर(ता चोपडा)ता 1: वेले (ता चोपडा)येथे असलेल्या तंट्यामामा भिल आदिवासी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी येथील जितेंद्र भीमराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कौशल्य विकास, रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या शिफारशीनुसार व्यवसाय शिक्षण व रोजगार संचालनालयाच्या संचालकांच्या मार्फत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या व्यवस्थापन समिती सदस्यांच्या नेमणूक करण्याचे आदेश निघाले असून त्या अन्वये ही नेमणूक करण्यात आली आहे .श्री पाटील यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांचे ऍड. बाळकृष्ण पाटील, डॉ. शरद पाटील यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने