डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणतर्फे चोपड़यात स्वच्छता अभियान आठ टन कचरा गोळा करत टाकला न.प.कचरा डेपोत
चोपडा दि.२(प्रतिनिधी) डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व महाराष्ट्र भूषण व पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण डॉ.श्री.सचिनदादा धर्माधिकारी रेवदंडा यांच्यामार्फत महास्वच्छता अभियानांतर्गत चोपडा येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यात १७२श्री सदस्यांनी विविध भागात स्वच्छता करीत अंदाजे ८ टन कचरा गोळा करून नगरपालिका कचरा डेपोत टाकण्यात आल्याने फार मोठ्या प्रमाणावर स्वच्छता झाल्याने शहरवासीयांनी सेवेकऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.
सकाळ पासून तर आठ वाजेपासुन तर जवळपास अकरा वाजे पर्यंत 8 टन कचरा गोळा करण्यास प्रारंभ केला त्यात धरणगाव नका ते शिवाजी चौक , सार्वजनिक बांधकाम विभाग , उपजिल्हा रुग्णालय , पंचायत समिती , ग्रामीण पोलीस स्टेशन , तहसील कार्यालय , न्यायालय , शहर पोलीस स्टेशनचोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन,न्यायालय,शासकीय विश्रामगृहात येथे स्वच्छता अभियान राबविले गेले. इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केल्याने शहरात ह्या सदस्याचे फारच कौतुक होत आहे.