प्रताप विद्या मंदिर शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
चोपडा दि.२८(प्रतिनिधी)आजच्या कार्यक्रमाची सुरुवात विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती. सपकाळे मॅडम व विज्ञान विषय शिक्षकांच्या हस्ते डॉ.रमन यांची प्रतिमा पूजन करून करण्यात आले. श्री डी एस पाटील सर यांनी आपल्या प्रास्ताविक वजा मनोगतातून विज्ञान दिन आजच्या दिवशी का साजरा केला जातो ? विज्ञानाचे दैनंदिन जीवनामध्ये असलेले महत्त्व सोप्या भाषेत विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. इयत्ता सहावी व सातवीच्या काही विद्यार्थ्यांनी सौ अश्विनी महाजन मॅडम यांनी मार्गदर्शन केलेल्या विज्ञान गीताद्वारे विद्यार्थ्यांनाशाळेत विज्ञानातील शोध व त्यांचे महत्त्व सांगण्याचा छानसा प्रयत्न केला.काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून विविध शास्त्रज्ञांबद्दल माहिती सांगितली.
सदर कार्यक्रमात विज्ञान गीत, भारतीय शास्त्रज्ञांची ओळख , विविध प्रयोग व त्यांचे स्पष्टीकरण सुंदररित्या विद्यार्थ्यांनी सादर केले. आपल्या मनोगतातून संस्थेच्या सचिव आ . ताई साहेबांनी मार्गदर्शन करताना आपल्या शाळेतून शिक्षण घेणारे विद्यार्थीही भविष्यात शास्त्रज्ञ होऊन इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देतील अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देऊन विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे आपल्या शुभहस्ते उद्घाटन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ७ वी क चा विद्यार्थी भारद्वाज महाले याने केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ प्रीती गुजराथी मॅडम यांनी केले. विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन व कार्यवाही सर्व विज्ञान अध्यापकांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व बी. एड. च्या प्रशिक्षणार्थीचे सहकार्य लाभले.