'सहाय्य संकल्प' उपक्रमांतर्गत चोपडा तालुक्यात 95 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर

 

'सहाय्य संकल्प' उपक्रमांतर्गत चोपडा तालुक्यात 95 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर 


चोपडादि.२९ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील 100 दिवस कार्यक्रमांतर्गत नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणे या बाबी अंतर्गत विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना सुविधा प्रदान करण्याच्या अनुषंगाने व प्रक्रिया अधिक पारदर्शक व गतिमान करण्यासाठी  जिल्हाधिकारी जळगाव यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्ह्यात 'सहाय्य संकल्प' हा उपक्रम राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

       'सहाय्य संकल्प' उपक्रमांतर्गत चोपडा तालुक्यात दिनांक 18/03/2025 रोजी ऑनलाइन पद्धतीने विशेष सहाय्य योजना मीटिंग घेण्यात आली आहे. सदर योजनेत 95 लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला असून 32 लाभार्थ्यांचे प्रकरण नामंजूर करण्यात आले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने