चोपडयाचे सायकल रायडींगचे अवलिया मयूर जैन यांचा २५०००किमी.चा प्रवास थरारक..
चोपडा दि.३०(प्रतिनिधी): चोपडा येथील सायकल रायडींगचे कोहिनूर म्हणून ख्याती असलेले अवलिया तथा प्रिया बेकरीचे चालक-मालक श्री मयूर जैन यांनी आज मार्च २०२५ महिना अखेर २५०००कि.मी. अंतर कापण्याचा विक्रम नोंदवित खान्देशातील हिरो असल्याचे दाखवून दिले आहे.सायकलिंगच्या प्रवासात २५,००० किलोमीटर हा मैलाचा दगड पार करणे ही केवळ संख्या नाही, तर त्यांचा मेहनतीचा, जिद्दीचा आणि चिकाटीचा गौरव आहे!..
त्यांचा सायकलचा पराक्रम गेल्या दोन महिन्यांत ८०००किमी चा प्रवास करीत २५ हजार किमी चा पल्ला चोपडावासियांसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे...त्यांनी काही दिवसांपूर्वी २५० अर्धशतकी सायकल राईड पूर्ण केली... असून गेल्या काही महिन्यात एकही दिवसाच्या खाडा न पाडता जानेवारीमध्ये १८००० किलोमीटर सायकलिंग केली आहे. विशेष म्हणजे प्रति दिवशी ५० किलोमीटरच्या खाली त्यांनी सायकल चालवली नाही त्यांच्या कर्तबगारीचे शहरवासियांनी जोरदार स्वागत करून अभिमानाची बाब असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी शारीरिक सुदृढता आणि आरोग्यासाठी सायकलिंगला सन २०२३ प्रारंभ केला असून लहान लहान राइटड्स करून ते अर्धशतकी आणि शतकी राइटड्स कडे झेपावू लागले आहेत.. श्री. मयुर जैन हे व्यवसायिक असून जबाबदारीचा मोठा बोजा पार पाडत सायकल रायडींगचा छंद जोपासत आहेत. त्यामुळे शारीरिक मानसिक उत्तम स्वास्थ्य लाभल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला आहे. चोपड्यातून पहिले एस आर होण्याचा मानही मिळवला आहे...तुमची ही जिद्द आणि आत्मबल भविष्यातही तुम्हाला नवनवीन शिखरे गाठण्यास मदत करो! अशा सदिच्छा स्नेहीजन,व तालुकावासियांनी व्यक्त केल्या आहेत . पुढील सायकलिंग प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!