वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची घाई शासनाने करू नये मुख्यमंत्र्यांकडे अभिजित आपटेंची मागणी

 वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची घाई  शासनाने करू नये मुख्यमंत्र्यांकडे अभिजित आपटेंची मागणी


पुणे दि.२९(प्रतिनिधी): महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली म्हणजे त्या पुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांचे रायगडाकडे लक्ष नव्हते साक्षात शिवप्रभुंकडे वारसांचे दूर्लक्ष झाले ही वस्तुस्थिती लक्षात घेता वाघ्या कुत्र्याबाबत वारसांना माहिती असणे शक्यच नव्हते. भारतात कुत्रा हा हिन दर्जाचा प्राणी नाही दत्तगुरूचा आशिर्वाद प्राप्त या प्राण्याला देवाचा दर्जा झाला आहे शिवाय कुत्र्याला माणसापेक्षा प्रामाणिक मित्र म्हणून पाहिलं जातं. कुत्रा या प्राण्याकडे मालकाचा अत्यंत जवळचा लाडका विश्वासु म्हणून देखील जगभरात ओळख आहे त्यामुळे पुजनिय रायगडावरील वाघ्या कुत्र्याची वास्तु पाडणे हे प्राणीमात्रांवरील भूतदेयेचा अनादर करण्यासारखे आहे. वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली होती की नव्हती हा संशोधनाचा विषय होऊ शकतो पण त्याचसोबत महाराजांची समाधी देखील दुर्लक्षित होती ती महात्मा ज्योतिबा फुले यांना शोधून काढावी लागली त्यामुळे वाघ्या कुत्रा विस्मरणात गेला असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला त्याप्रमाणे वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची घाई पुरातत्त्व विभागाने आणि महाराष्ट्र सरकारने करू नये अशी विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना राजकीय विश्लेषक अभिजीत आपटे यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने