चोपडा नगरपरिषदेमार्फत वेस्ट टू वेल्थ संकल्पनेतून GVP Point वर मात

 चोपडा नगरपरिषदेमार्फत वेस्ट टू वेल्थ  संकल्पनेतून GVP Point वर मात

चोपडादि.२८(प्रतिनिधी) नगरपरिषद मार्फत स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सदर अभियानाच्या निकषांची पूर्तता करणे नगरपरिषदेस आवश्यक आहे. त्या अनुषंगाने नगरपरिषदेमार्फत विविध कामे करण्यात येत आहेत यामध्ये प्रामुख्याने शहरांमध्ये नागरिक विविध ठिकाणी वारंवार दैनंदिन कचरा फेकतात यामुळे कचऱ्याचे ढीग (GVP Point) निर्माण होतात आणि शहरातील सौंदर्य खालावते. परंतु सदरची बाब लक्षात घेता चोपडा नगरपरिषदेचे मा.मुख्याधिकारी श्री.राहुल पाटील सो., यांच्या मार्गदर्शनानुसार चोपडा नगरपरिषदेचे विविध ठिकाणी अश्या स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. तरी अश्या परिसरांची दैनंदिन स्वच्छता करण्यात येऊन त्या जागेवर सुशोभीकरण करण्याचे काम चोपडा नगरपरिषदेने हाती घेतलेले आहे. यात पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात चौथरा बांधून यावर भंगार रिक्षा पासून नाविन्यपूर्ण रंगरंगोटी करून सुशोभीकरण करून त्या चौथ्यावर ठेवण्यात आलेले आहे व सोबतच याबाबतची सूचना फलक देखील नगर परिषदेमार्फत नागरिकांकरिता लावण्यात आलेला आहे. सदर चौकाचे अनावरण कार्यक्रम आज दि.28/02/2025 रोजी मा.मुख्याधिकारी श्री.राहुल पाटील सो., यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडले. या कार्यक्रमात फलकावर फित कापुन उद्घाटन करण्यात आले. 

या कार्यक्रमा प्रसंगी मुख्याधिकारी श्री.राहुल पाटील यांनी नागरींकाना उद्देशुन संबोधले की, *“अभियान राबवित असतांना नगरपरिषदेस नागरिकांच्या सहकाऱ्याची देखील आवश्यकता आहे, कारण हे चौक सुशोभीकरण झाल्यानंतर कोणत्याही नागरिकांनी या परिसरामध्ये पुन्हा कचरा टाकून कचऱ्याचा ढिग निर्माण न होण्याची काळजी ही नागरिकांनीच घेतली पाहिजे, ज्यामुळे त्या परिसरात रस्त्यांचे किंवा परिसराचे सौंदर्य हे कायम टिकून राहील व शहराच्या सौंदर्यीकरणाच्या मानांकनात वाढ होईल व मला खात्री आहे की चोपडा शहरातील नागरिक याकरिता विशेष असे सज्ज असतील.”* या चौकात ठेवलेल्या वस्तू रिक्षा ही रंगरंगोटी करून याद्वारे संदेश देण्यात आलेला आहे. वेस्ट टू वेल्थ च्या माध्यमातून त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे ज्यामुळे वेस्ट रिडक्शन ही संकल्पना वाढीस लागून नागरिकांमध्ये RRR (Reduce-Reuse-Recyle) ही संकल्पना पोहोचावी त्याचप्रमाणे वस्तूचे सुशोभीकरण करून कचऱ्याच्या GVP Point वर ठेवल्यानंतर त्या परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल व नागरिकांमध्ये जनजागृती देखील करणे हा नगरपरिषदेचा मुख्य उद्देश आहे. 

या मोहिमेत मा.मुख्याकारी श्री.राहुल पाटील सो., स्वच्छता निरीक्षक श्रीमती दिपाली साळुंके, श्री.जयेश भोंगे, शहर समन्वयक स्वप्निल धनगर यांनी सदर कार्यक्रमाकरीता परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास उपमुख्याधिकारी श्री.संजय मिसर, कर अधिकारी श्री.संदिप गायकवाड, श्री.प्रणव पाटील, श्री.अक्षय चौधरी, मिळकत व्यवस्थापक श्री. संजय ढमाळ, विद्युत अभियंता श्री.मंगेश जंगले, संगणक अभियंता श्री.अंकुश पाटील, परिसरातील नागरीक निलेश वाघ व इतर नागरीक सहभागी झाले होते त्याच स्वच्छता विभागाकडील मुकादम, मदतनीस-कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने