अडावद येथे शा. ये. महाजन विद्यालयात राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम संपन्न

 अडावद येथे शा. ये. महाजन विद्यालयात राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम संपन्न 


अडावद ता. चोपडादि.२७(प्रतिनिधी): येथील येथील शामराव येसो महाजन विद्यालयात राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र अडावद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पाटील यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन आरोग्य सुदृढ राखण्यासाठी हात धुण्यापासून, समतोल आहार, स्वच्छ पाणी, व्यसनमुक्ती अशा अनेक बाबी सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या  यावेळी आरोग्य सहाय्यक वाय. आर.  पाटील,  आरोग्य सहाय्यक राहुल मेहकर, प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ सचिन महाजन मुख्याध्यापक आर. के. पिंपरे मंचावर होते.

     २८ रोजी दुपारी १ वाजता  श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र अडावद येथे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना डॉ. अर्चना पाटील यांनी अपल्या आरोग्याचे महत्व विशद करतांना मुलांनी जिभेला चांगले वाटणारे बाहेरील जंक फुड  न खाता घरातील शेंगदाणे, फुटाणे खावेत त्यात प्रोटीन असतात. तसेच मोड आलेली कडधान्ये, भाजीपाला, अंडी अशा पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करून समतोल आहार घ्यावा त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहील असे सांगितले. 

    तसेच आरोग्य सहायक वाय. आर. पाटील यांनी हात धुतांना कोणत्या पंचासुत्रीचा वापर करावा हे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना पटवून दिले. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ सचिन महाजन यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाच्या सवयी कशा लागतात त्यापासून आपण दूर कसे राहू याबाबत मार्गदर्शन केले.

      यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक एन. ए. महाजन, व्ही. एम. महाजन, एस. जी. महाजन, एम. एन. माळी, पी.आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पी.एस. पवार तर शिक्षकेतर कर्मचारी सी.एस.महाजन , ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, अशोक महाजन यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने