पंकज उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

 पंकज उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा


चोपडा दि.२८(प्रतिनिधी)पंकज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चोपडा येथे शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासाहेब व्हि.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदलाल वाघ सर व मार्गदर्शक प्रा.डी.जे.बाविस्कर सर होते. प्रतिमा पूजन व मान्यवरांच्या स्वागत सत्काराने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक व्हि.आर.पाटील सर यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व सांगताना डॉ.सी.व्ही.रामण यांनी वैज्ञानिक क्षेत्रात केलेल्या त्यांच्या कार्याची माहिती दिली.मानवी कल्याणासाठी विज्ञान सर्व क्षेत्रात महत्त्वाचे आहे ते उदाहरण देऊन विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी महत्त्वाची आहे असे सांगितले. कार्यक्रमात सर्व विज्ञान शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थी,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भादले सर तर आभार डी.जे.बाविस्कर सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापकांनी व शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने