साहित्यिकांनी मराठीचा झेंडा अटकेपार लावला- प्रा.एस.टी.कुलकर्णी
चोपडादि.२७(प्रतिनिधी) - मराठी भाषा नानाविध साहित्य प्रकारांनी समृध्द भाषा आहे.मराठीचा बोलीभाषा म्हणून बावीसशे वर्षांपासूनचा इतिहास दिसून येतो.जगात पंधराव्या तर देशातील विविध भाषांमध्ये चौथा क्रमांक आहे.संत ज्ञानेश्वर,एकनाथ,तुकाराम यांनी पद्य रचनांनी मराठीची सेवा केली.त्यानंतर वि.स.खांडेकर,कुसुमाग्रज यांच्या सारख्या साहित्यिकांनी मराठीचा झेंडा अटकेपार लावला आहे.मराठीचे महत्व अधिकाधिक वाढविण्यासाठी वापर वाढविण्याची आपली जवाबदारी असे प्रतिपादन व काव्य वाचन नगर वाचन मंदिराचे उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी यांनी येथे केले.
येथील नगर वाचन मंदिर तालुका वाचनालयात कवि कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी राज्य भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी कवि कुसुमाग्रज यांच्या फोटोला हार अर्पण करून वाचनालयाचे अध्यक्ष आशिष गुजराथी यांनी अभिवादन केले. कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी प्रास्ताविक केले.आभार प्रदर्शन श्रीकांत नेवे यांनी केले.
यावेळी सदस्य अवधूत ढबु, स्नेहल पोतदार, विलास पाटील, किरण गुजराथी, रजनी सराफ सभासद व वाचक वर्ग उपस्थित होते.