महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्या बाबत आवश्यक तो कायदा करावा : जयसिंग वाघ

 महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्या बाबत आवश्यक तो कायदा करावा : जयसिंग वाघ 

--------------------------------------------------------------------

जळगाव दि.२८(प्रतिनिधी):-  बिहार येथील  जगप्रसिद्ध महाबोधी महाविहार आजही बौद्धांच्या ताब्यात नसल्याने बौद्ध संस्कृतीचे जतन , संवर्धन करणे कठीण होत आहे ,अन्य धर्मीय लोक तिथं त्यांची पूजा अर्चा , धार्मिक विधी करतात तसेच पर्यटकांना चुकीची माहिती देतात .   महाविहार हे बौद्ध जनतेच्या पूजेचे ,  श्रद्धेचे , भावनांचे स्थळ असल्याने ते बौद्धांच्याच ताब्यात असणे आवश्यक आहे त्या करिता आवश्यक तो स्वतंत्र कायदा बिहार सरकारने  करावा असे स्पष्ट प्रतिपादन साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.

           महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणी करिता पंधरा दिवसांपासून जगभरातील शेकडो बौद्ध भिख्खू बुद्धगया येथे आंदोलन करीत आहेत त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून जळगाव येथील अजिंठा हाउसिंग सोसायटी तर्फे राष्ट्रपतींना जळगाव जिल्हाधिकारी यांचे मार्फत  एक निवेदन देण्यात आले . अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी निवेदनाचा स्वीकार केला . या निवेदनात सदर विहाराची ऐतिहासिक माहिती देवून ते बौद्धांच्या ताब्यात असण्या विषयी राष्ट्रपतींनी आवश्यक त्या सूचना बिहार सरकारला देण्या बाबत विनंती करण्यात आली आहे . निवेदन दिल्या नंतर उपस्थित जनतेस माहिती देताना वाघ बोलत होते .

       निवेदनावर जयसिंग वाघ , दिलीप सपकाळे , आनंद कोचुरे , पी. डी. सोनवणे , दिलीप तासखेडकर, ज्योती भालेराव , कविता सपकाळे , सुनंदा वाघ ,  चंद्रशेखर अहिरराव , सुनील बिऱ्हाडे ,  सिंधू तायडे , माया भालेराव, नूतन तासखेडकर ,  मंगला बोदोडे , संजय जाधव , दत्तू सोनवणे  , बाबुराव वाघ ,  निलेश सैंदाणे , विजया  शेजवळे ,  प्रवीण नन्नवरे ,  अशोक सैंदाणे , कमल सोनवणे , विजय भालेराव , यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने