राज्य चित्रकला प्रदर्शनात प्रमोद वारुळे ला बक्षीस

 राज्य चित्रकला प्रदर्शनात प्रमोद वारुळे ला बक्षीस 

चोपडा,दि.२८(प्रतिनिधी) येथील भगिनी मंडळ संचालित,ललित कला केंद्र, चोपडा या चित्रकला महाविद्यालयातील फाउंडेशन विभागाचे प्रमोद महेश वारुळे या विद्यार्थ्याला भाऊसाहेब देशमुख कला अकॅडमी अमरावती या 2024 - 25 या शैक्षणिक वर्षाचे महाराष्ट्र राज्य स्तरावरील चित्रकला प्रदर्शनात तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले,दोन हजार रुपये रोख व प्रमाणपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप असून नुकत्याच झालेल्या बक्षीस समारंभात ते देण्यात आले.

संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूनम गुजराथी समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य आशिष गुजराथी, प्राचार्य सुनील बारी, प्रा. विनोद पाटील, प्रा. संजय नेवे, भगवान बारी, अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी व  संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले व त्याला पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात.

.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने