राष्ट्रवादी नेते अभिजीत आपटे यांनी दिल्लीत मराठीच्या अपमानाबद्दल व्यक्त केली खंत
तळेगाव दाभाडे दि.२८(प्रतिनिधी): मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत साहित्यकला आणि संस्कृती मंडळातर्फे मराठी भाषा गौरव दिन तळेगाव दाभाडे तेलीआळी चौक, तेली सभागृह या ठिकाणी साजरा करण्यात आला.
प्रसिद्ध साहित्यिक गो.नी. दांडेकर आणि प्रसिद्ध कवी कै. एडवोकेट सहदेव मखामले यांनी तळेगाव दाभाडे शहरांमध्ये साहित्य कला संस्कृती मंडळाचे हे रोपट लावलं आणि त्यांच्या नंतर देखील या रोपट्याला वाढवण्याचे काम मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच सहदेव मखामले यांचे चिरंजीव शैलेश मखामले थांबले नाहीत हे कार्य तळमळीने करताना दिसत आहेत. मराठी भाषेचा गौरव असो मराठी निबंध स्पर्धा असो मराठी व्याकरण किंवा मराठी हस्ताक्षर असे अनेक कार्यक्रम सतत मंडळातर्फे सुरू असतात अशी माहिती संस्थेचे सचिव श्री अर्जुन गायकवाड यांनी दिली. आज मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त साधत ह भ प नितीन महाराज मोरे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते नितीन महाराज मोरे यांनी मराठीचा उगम कसा झाला तसेच मराठीच्या उगमाचा काळ आणि मराठी कशी प्रगत होत गेली संत साहित्याने मराठी ची श्रीमंती कशी वाढवली मुघलांच्या परकीय आक्रमकांच्या गुलामीच्या कालखंडात देखील मराठी कशी टिकली महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात राजस्थान पंजाब उत्तर प्रदेश या ठिकाणी देखील एकनाथ महाराजांनी मराठीचा प्रचार प्रसार केला ग्रंथ लिहिले आणि काशी विश्वेश्वरामध्ये मराठीची दिंडी त्या वेळा कशी निघाली असे अनेक ऐतिहासिक गौरवास्पद क्षणांची माहिती नितीन महाराज यांनी दिली. तर प्रसिद्ध साहित्यिक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रभाकरजी ओव्हाळ यांनी आपल्या भाषणादरम्यान मराठीला अभिजात नाही तर अभिजन म्हणून गौरवण्यात यायला हवं होतं अशी खंत व्यक्त केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य अत्रे यांचा एक किस्सा सांगितला त्याचप्रमाणे छावा या हिंदी चित्रपटाविषयी प्रेमाची भावना व्यक्त केली.
तसेच प्रसिद्ध उद्योगपती श्री विशाल साहेबराव लोखंडे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत आपटे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते आपल्या मनोगतामध्ये अभिजीत आपटे यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलन जे दिल्लीमध्ये झालं या संमेलनात इंग्रजीमध्ये नावाच्या पाट्या लावून कसा मराठीचा अपमान शासन स्तरावर करण्यात आला राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शरद पवार उपस्थित होते या दोन दिग्गज मराठी माणसांच्या उपस्थितीत हा मराठीचा अपमान करण्यात आला याविषयी खंत व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा स्नेहलताई बाळसराफ यांनी मंडळाची माहिती उपस्थित त्यांना सांगितली. आरती पेंडभाजे यांनी सूत्रसंचालन केलं तर श्री पेंडसे यांनी आभार प्रकटन केले.