हंड्याकुंड्या धरणासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता .. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचे यश
चोपडा दि.19 (प्रतिनिधी)गेल्या २७ वर्षांपासून रखडलेला सातपुड्यातील हंड्याकुंड्या धरण साकारण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.लघु पाटबंधारे प्रकल्प हंड्याकुंड्यास प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. श्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली १८ रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली.
यावेळी चोपड्याचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री ना. श्री. अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे आभार मानले यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल जी तटकरे ,आ. मंगेश चव्हाण , आ. राजु मामा भोळे,आ. चंद्रकांत पाटील,माजी आ. प्रा. साहेबराव घोडे ,जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपुर , विनोद भाऊ देशमुख हे उपस्थित होते.
सन १९९८ पासुन रखडलेला लघु पाटबंधारे प्रकल्प हंड्याकुंड्याचे प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. यामुळे आदिवासी भागातील शेतकरी बांधवांना यांचा खुप मोठा फायदा होणार आहे.