श्रीविश्वनाथ महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भागवत कथा व किर्तन सप्ताह आयोजन
चोपडा,दि.१९(प्रतिनिधी) शहरातील बोरोले नगर -१ येथे श्री विश्वनाथ महादेव मंदिरात दरवर्षाप्रमाणे भागवत कथा व किर्तन सप्ताहाचे आयोजन मंदिर समिती तर्फे करण्यात आले आहे. भोलेनाथाच्या कृपने महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर किर्तन सप्ताह मदिरांच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाने होत असतो.
दि. 20/2/25 ते 27/2/25 दरम्यान पार पडत आहे. दररोज दुपारी १ ते ४ च्या दरम्यान भागवतकथा होणार तर किर्तन रात्री 8-30 वाजता होणार आहे. पालखी सोहळा व शोभायात्रा 26/2/25 रोजी या दुपारी 2 ते 5 वाजेच्या दरम्यान होणार आहे .महाप्रसाद व भंडारा दि.२७/२/२५ वार गुरुवार रोजी सकाळी ११ ते २.०० पर्यंत होणार आहे .भागवतकथा कै. ह. भ. प. सुभाष लोटन मनोरे याच्या स्मरणार्थ श्री योगेश सुभाष मनोरे यांच्या तर्फे होणार आहे .व महाप्रसाद भंडाराचे स्व. मनोजभाऊ अग्रवाल याच्या स्मरणार्थ होणार आहे तरी भक्तांनी भागवत कथा व किर्तनाचा लाभ घ्यावा असे मंदिर समिती तर्फे आवाहन करण्यात आले आहे.