ज्येष्ठ नागरिक संघ चोपडा तर्फे छत्रपती शिवरायांना अभिवादन !
चोपडा दि.19(प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्य संस्थापक छ .शिवाजी महाराज जन्म दिना निमित्त त्यांच्या प्रेरणादायी कर्तृत्वाला उजाळा व अभिवादन करणेसाठी चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात श्रीमंत योगी छ . शिवरायांच्या प्रतिमेचे संघाचे उपाध्यक्ष जिजाबराव नेरपगारे यांच्या शुभहस्ते भावपूर्ण पूजन व माल्यार्पण करण्यात आले .
या प्रसंगी माजी अध्यक्ष विजय करोडपती, विद्यमान सचिव विलास पाटील खेडीभोकरीकर , सहसचिव इंजि.व्ही.एस . पाटील, कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील , कार्य . संचालक गोविंदा महाजन , प्रा .श्याम गुजराथी , राजेंद्र साळुंखे , मधुकर बाविस्कर, शिंदे तात्या, फेस्कॉम तालुका सचिव शांताराम पाटील , विनय पाठक, संजय बजाज, भालचंद्र बडगुर्जर , गोकूळ पाटील, सतीश पाटील , अशोक पाटील , बारी व संघाचे इतर सदस्य उपस्थित होते .