जिल्हाधिकाऱ्यांनी जखमी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची घेतली भेट..चोख कर्तव्य बजावल्या बद्दल दिली शाब्बासकीची थाप..!
चोपडा दि.१६(प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील उमर्टी येथे चोपडा ग्रामीण पोलीसांनी गावठी कट्ट्यातील मुख्य आरोपी पप्पी सिंग यास जेरबंद करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात एकूण चार पोलीस वाले जखमी झाले होते त्या जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सागर पाटील यांनी प्रथमोपचार केल्या त्या नंतर पुढील उपचारासाठी जखमीना मोरेश्वर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले त्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेण्यासाठी जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद हे चोपडा येथिल मोरेश्वर हॉस्पिटल चोपडा येथे आले असता त्यांनी रुग्णांकडूनं सत्य परिस्थिती जाणून घेत त्यांचे कौतुक केले व त्यातील मुख्य आरोपीस अटक केले त्या कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक करत त्यांना चांगल्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या..