जिवाभावाच्या लोकांच्या विश्वासावर निवडून आलो - आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे .. जाहीर सभा घेऊन मतदारांचे आभार माननारे पहिलचे लोकप्रतिनिधी

 

जिवाभावाच्या लोकांच्या विश्वासावर निवडून आलो - आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे .. जाहीर सभा घेऊन मतदारांचे आभार माननारे पहिलचे लोकप्रतिनिधी


चोपडा,दि.१६ (प्रतिनिधी) : गेल्या दहा वर्षांपासून कोणत्याही जातीपातीचे राजकारण न करता हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या विचारांवर विविध विकासकामे केलीत माझ्या विरुद्ध सर्वपक्षीयांनी एकच उमेदवार दिला परंतु माझ्या जिवाभावाच्या लोकांच्या विश्वासावर मी निवडून आलो. असा कृतज्ञता भाव आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी आभार सभेत बोलतांना व्यक्त केला.
    दि. १५ रोजी चोपडा कृषि उत्पन्न बाजारात समितीत आयोजित मतदार आभार सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी बोलतांना आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे म्हणाले की,गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांनी लाडकी बहीण योजने सारखे अनेक लोकप्रिय योजना अमलात आणल्या तसेच मतदारसंघासाठी भरघोस निधी दिला. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील,मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते यांनी तसेच शिवसेना प्रेमी मुस्लिम बांधवांनी मदत केली. या सर्वांना वाटले की मी जनतेमध्ये येईल, जनतेचे काम करील असा विश्वास त्यांना वाटला म्हणून त्यांनी मला निवडून दिले. या सर्वांचे आभार व्यक्त करीत त्यांनी सांगितले की, चोपडा तालुका हा बुद्धिवंतांचा खाण असलेला तालुका आहे म्हणून माझ्या पाठीमागे उभा आहे. प्रत्येक गावात विकासकामे देत प्रत्येक गावाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ज्या गावात कमी मतदान पडले तेथे काय चुकलो ती चूक शोधून व पुढील नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवूया असे आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिक व कार्यकर्त्यांना केले.
   सभेपूर्वी चोपडा कृषि उत्पन्न बाजारात समितीचे हमाल मापाडी भवनाचे उद्घाटन माजी आ.सौ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
     सभेस माजी आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे ,जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल,सुभाष साळुंखे,चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील,हमाल मापाडी संघ जिल्हाध्यक्ष कामेश सपकाळे, कृउबा संचालक रावसाहेब पाटील,गोपाल पाटील,शिवराज पाटील,विजय पाटील,सुदर्शन पाटील,किरण देवराज,कल्पना पाटील,डॉ. विकी सनेर, सौ.मंगला पाटील, सौ.संध्या महाजन,सौ.भावना माळी,सौ.स्वाती बडगुजर, सौ कविता पाटील, सौ.शितल देवराज,अनिता शिरसाठ,विकास शिंदे,रवींद्र वाघ,प्रताप पाटील  हरीश पाटील,विकास पाटील,नामदेव पाटील, मेहमूद बागवान,जावेदखा पठाण,साहेबराव शिरसाट,राजेंद्र पाटील,किशोर चौधरी,प्रकाश  राजपूत,महेंद्र धनगर,सागर ओतारी,अरुण पाटील,गोपाळ चौधरी, विनोद पाटील ,रवींद्र पाटील,प्रकाश रजाळे,भरत चौधरी,पी.आर. माळी, राजेंद्र पाटील,कैलास बाविस्कर,नंदू गवळी,दीपक चौधरी,प्रदीप बारी,हरीश पवार, सचिन महाजन,मंगल इंगळे व सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने