चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न

 चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न 

चोपडा दि.१६(प्रतिनिधी)येथील श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक) मध्ये १५ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्रसंगी त्यांनी मुलाखतीसाठी  उपस्थित असलेल्या तरुणाईंना मार्गदर्शन केले या मेळाव्यात बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. 

यावेळी बजाज, मारुती सुझुकी, किर्लोस्कर अशा कंपन्यांचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि संधी देण्यासाठी उपस्थित होते. या मेळाव्यात २८०विद्यार्थी मुलाखतीसाठी उपस्थित होते यातील  ११७ विद्यार्थ्यांची निवड झाली यातील काही विद्यार्थ्यांना वार्षिक सव्वा दोन लाख रुपये तसेच इतर विद्यार्थ्यांना वार्षिक तीन लाख रुपये याप्रमाणे वार्षिक  पॅकेज मिळाले निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेचे सचिव मा.ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य मा. व्हि एन बोरसे तसेच मा.डॉ. एस पी अहिरराव यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 

या मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री व्ही. एन. बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्री भूषण जे. पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांना बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे आणि पासपोर्ट फोटोसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

या रोजगार मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची दिशा निश्चित करण्याची आणि रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याची संधी मिळाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने