बालयोगी सदानंद महाराजांच्या हस्ते प्रयागराजमध्ये ज्ञानेश्वरी पारायण
वसई दि.१८(प्रतिनिधी): वसईतील बालयोगी श्री सदानंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वारिंगे महाराज, विलास महाराज भोसले कबीर महाराज उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले बालयोगींचे सुमारे अडीच हजार भक्तगण ज्यांत महिलांची संख्या मोठी आहे. यावेळी सहभागी झाले होते.
१६ ते २३ फेब्रुवारी दरम्यानचालणाऱ्या ह्या ज्ञानेश्वरी सप्ताह सोहळ्यात तुकाराम महाराज शास्त्री बीड हे राम कथाकथन करणार आहे. योगीराज गोसावी पैठण, विश्वनाथ महाराज वारिंगे -अंबरनाथ, विजय महाराज जगताप-पुणे, जगन्नाथ महाराज पाटील शहापूर ह्यांची किर्तने होणार आहेत. तर सांगता कार्यक्रम कथा प्रवचनकार सर्वश्वरीताई याच्या उपस्थितीत दिपोत्सव व तुकाराम महाराज शास्त्री बीड यांचे किर्तनाचे होणार आहे. या पारायण सप्ताह सोहळ्यास उत्तर प्रदेशच्या महत्त्वाचे महंत व राजकीय मान्यवर भेट देणार आहेत. सप्ताह सोहळ्याचे औचित्य साधून येथील नागरिकांसाठी आश्रम संस्थेतर्फे वनौषधी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.