आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याकडून ‌जखमी पोलिसांची भेट घेऊन तब्येतेची आस्थेवाईकपणे विचारपूस

 आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याकडून ‌जखमी पोलिसांची भेट घेऊन तब्येतेची आस्थेवाईकपणे विचारपूस 

उमर्टी मध्यप्रदेश मध्ये पोलीसावर झालेल्या हल्लातील जखमीची विचारपुस करतांना..आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे..

चोपडा,दि.१८(प्रतिनिधी) : चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मध्यप्रदेश सीमेवरती असलेले पार उमर्टी गावात बनावट कट्टे बनविणाऱ्या आरोपीला पकडले असता तेथील ग्रामस्थांनी घेराव घालून ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जीव घेणा हल्ला केला त्यात  अधिकारी दोन कर्मचारी व एक होमगार्ड जखमी झाल्याने त्यांना चोपडा येथील खाजगी हॉस्पिटल ला उपचार घेण्यासाठी ऍडमिट केले आहे या अधिकाऱ्यांची तब्येत संदर्भात विचारपूस करण्यासाठी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी हॉस्पिटल येथे जाऊन जखमी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्येती संदर्भात विचारपूस केले या वेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने