शेखपुरा भागात संत रविदास महाराज यांची जयंती साजरी
चोपडा दि.१४(प्रतिनिधी) येथील शेखपुरा भागात संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी चोपड्याचे आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकात सोनवणे व भानुदास विसावे यांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे फित कापून उद्घाटन व पूजन करण्यात आले यावेळी शेख पूरा भागातील सर्व चर्मकार बांधवांच्या हस्ते आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा भव्य मोठा पुष्प हार घालून सत्कार करण्यात आला .
यावेळी धरणगावचे प्रांतिक सदस्य महाराष्ट्र राज्य चर्मकार समाज भानुदास विसावे ,चोपड्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, चर्मकार समाजाचे जिल्हा अध्यक्ष पांढुरंग बाविस्कर, दिलीप नेवे ,सागर ओतारी, महेंद्र धनगर श्री प्रा. सौदाणकर, नाना मोरे ,परेश चित्ते, निलेश वाघ, जितेंद्र विसावे ,संतोष बाविस्कर ,श्री वारे,महेंद्र धनगर मा.नगरसेवक, महेमुद बागवान दिपक चौधरी ,प्रदिप बारी, अनुप जैन ,नंदु गवळी, इम्रान खाटीक ,मोईन कुरेशी ,हरिष पवार, विनोद खजुरे, जितेंद्र विसावे, निलेश वाघ प्रकाश महाले भोजू अहिरे शंकर आदी उपस्थित होते.