आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. हिमांशू गुजराथी यांची निवड

 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. हिमांशू गुजराथी यांची निवड


चोपडा दि.१०(प्रतिनिधी)- अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी जेनिटोरिनरी परिषदेसाठी 'टेस्टीक्युलर कॅन्सर' या विषयावर संशोधन पेपर आणि पोस्टर प्रेझेंटेशनसाठी चोपडा येथील डॉ. हिमांशू गुजराथी यांची निवड झाली आहे. 

भारतातून सुमारे ११०० हून अधिक आंतरराष्ट्रीय नोंदणीमधून डॅा.हिमांशु गुजराथी यांचा शोध निबंध निवडला गेला ही चोपडा तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. डॉ. हिमांशू गुजराथी हे येथील गुजराथी गल्लीतील रहिवासी इंजी. नितीन गुजराथी यांचे सुपुत्र असून त्यांनी आपले शालेय शिक्षण चोपडा येथे घेतले असून महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथून पूर्ण केले आहे.

डॉ हिमांशू यांना मिळालेल्या या संधिबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ते या परिषदेसाठी ११ रोजी मुंबई येथून रवाना होणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने