स्वामिनी प्रकल्प, आधार संस्था, उमेद प्रकल्प अमळनेर प्रतिनीधींचा टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अभ्यास दौरा


स्वामिनी प्रकल्प, आधार संस्था, उमेद प्रकल्प अमळनेर प्रतिनीधींचा टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अभ्यास दौरा 

अमळनेर,दि.८(प्रतिनिधी):महिलाउद्यमशीलता,उपजीविका  संवर्धन आणि कौशल्य विकास यासाठी अमळनेर तालुक्यात महिला सक्षमीकरण, साठी आधार संस्था स्वामिनी प्रकल्प व पंचायत समिती उमेद कार्यक्रमांतर्गत दिनांक 6/ 2 /2025 रोजी सकाळी ठीक 10.30 वा.टाटा सामाजिक विज्ञान संस्था,रुरल कॅम्पस, तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे  अभ्यास दौरा  संपन्न झाला.

या दौऱ्यात आधार बहुउद्देशिय संस्था अमळनेर अध्यक्ष डॉ भारती पाटील ,कार्यकारी संचालक श्रीमती रेणु प्रसाद , संपर्क अधिकारी ,दिपक संदानशिव,  लेखाधिकारी  अश्विनी भदाणे,  स्वामिनी प्रोजेक्ट मॅनेजर मुरलीधर बिरारी, समन्वयक उर्जीता शिसोदे, अशोक पाटील, योगिता बिरारी तसेच उमेद प्रकल्प , पंचायत समिती अमळनेर येथून सिमा भिमराव रगडे,तालुका अभियान व्यवस्थापक Block Mission Managerपंचायत समिती अमळनेर, ज्योती वसंत भावसार तालुका व्यवस्थापक ,पंचायत समिती अमळनेर, ललिता आसाराम पाटील प्रभाग समन्वयक पंचायत समिती अमळनेर, प्रतिभा पाटील ,कम्युनिटी रिसोर्स पर्सन, विद्या पाटील, कम्युनिटी रिसोर्स पर्सन पळासदळे, भारती पाटील, कम्युनिटी रिसोर्स पर्सन डांगर, शारदा पाटील ,कम्युनिटी रिसोर्स पर्सन, वर्षा पाटील कृषी सखी, योगिता पाटील उद्योजिका सहभागी झाले आहेत.

दिपक संदानशिव यांनी प्रास्ताविक  मांडणी केली, आधार संस्थेचे डॉ. भारती पाटील  यांनी स्वामिनी प्रकल्प बद्दल सविस्तर माहिती दिली व एक्सपोजर विजिट चा उद्देश यावर माहिती दिली, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स चे प्रा गणेश चादरे  यांनी संस्थेच्या इतिहास, स्थापना, उद्देश, महिला सक्षमीकरण, शिक्षण, शेतकऱ्यांच्या विविध समस्या, संस्थेचे मुंबई ,तुळजापूर गुवाहाटी, हैद्राबाद या ठिकाणी कॅम्पस विषयी माहिती दिली. केंद्रित केलेले कामाचा तपशील  व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांना दाखविण्यात आला. तसेच दहा गुंठे शेती प्रकल्पात गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, फळबाग, विविध प्रकारची वृक्ष लागवड यावर शंकर ठाकरे  यांनी उपस्थितांना दिली. 

TISS येथे लायब्ररी मध्ये व्हिजिट करण्यात आली. त्यादरम्यान ग्रंथपाल यांनी लायब्ररीमध्ये असलेली सोशल सायन्स वरील 30000  हजार बुक्स, ई बुक सुविधा, डिजिटल लायब्ररी, विद्यार्थ्यांसाठी असलेले स्मार्ट कार्ड हे सद्यस्थितीला  लायब्ररी  येथे उपलब्ध आहेत तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पुस्तकांचे सेवा यावर माहिती दिली. सर्व उपस्थित्यांना दिली तसेच प्रत्यक्ष लायब्ररी मधील असलेले बुक्स दाखवण्याचे मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर लॅब  उपस्थितांना दाखवण्यात आली. 

त्याचप्रमाणे प्रा. संपत काळे यांनी सहभागी सोबत उपजीविका समस्या, पिअर लर्निंग, पाणी वापर संस्था,  फार्मर प्रोड्युसर कंपनी बद्दल माहिती, शेळीपालन, कुक्कुटपालन, शेती संदर्भातील उद्योग यावर मार्गदर्शन केले.सायंकाळी तुळजभवानीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने