शिक्षिका सौ.अरुणा सुहास देवराज ह्यांचा जिल्हास्तरीय विनोबा भावे पुरस्काराने गौरव

 

शिक्षिका सौ.अरुणा सुहास देवराज ह्यांचा जिल्हास्तरीय विनोबा भावे पुरस्काराने गौरव


चोपडा दि.८ (संजीव शिरसाठ ) तालुक्यातील बिडगाव जि. प. शाळेच्या शिक्षिका सौ.अरुणा सुहास देवराज यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या शुभहस्ते जिल्हास्तरीय विनोबा भावे पुरस्काराने गौरविण्यात आले आहे .  यावेळी जि. प.  मुख्यकार्यकारी श्री.अंकित  व  शिक्षणाधिकारी विकास पाटिल  यांची खास उपस्थिती होती.
विनोबा अँप बी स्पेलींग हा उपक्रम जिल्हाअधिकारी जळगाव व मुख्यकार्यकारी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित केला गेला आहे . त्या अनुषंगाने  ह्या पुरस्काराच्या मानकरी
सौ अरुणा देवराज ह्या ठरल्या आहेत.सदरील पुरस्काराबद्दल त्यांचे आमदार प्रा. चंदकांतजी सोनवणे , माजी आमदार सौ. लताताई सोनवणे , कोली / कोरी सामाजिक ऐकता संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संजीव शिरसाठ , कृषी उत्पन्न बाजार ' समिती सभापती नरेंद्र पाटिल, संचालक किरण देवराज, 
आदिंनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने