उद्यापासून महावीर नगरात दक्षिणमुखी श्रीरामभक्त महाविर हनुमान मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळा
चोपडा दि.१४(प्रतिनिधी)शहरातील महावीर नगरातील श्री.साईनाथ महेश्वर महादेव मंदिरासमोर दक्षिणमुखी श्रीरामभक्त महाविर हनुमान मंदीर प्राणप्रतिष्ठा,कळस व ध्वजारोहण सोहळा सोमवार, दिनांक १७/०२/२०२५ रोजी सकाळी ११ वा. प.पु. संत श्री. प्रसाद महाराज, (अमळनेर श्री सखाराम महाराज संस्थान चे गाधीपती) यांच्या शुभहस्ते होणार आहे.
सदरील प्राणप्रतिष्ठेचे कार्य प.पु. संतश्री महामंडलेश्वर १००८ श्री श्री बालयोगीजी महाराज यांच्या आशीर्वादाने तर आचार्य श्री. सुनिलजी महाराज नाईक, व श्री. संजयजी जोशी यांच्या मार्गदर्शनाने होत आहे
शनिवार, दिनांक १५/०२/२०२५ रोजी सकाळी : ०९ ते १२ श्री नवश्या मारोती मंदिर आशा टॉकीज चौक ते महावीर नगर पर्यंत शोभायात्रा निघणार आहे दुपारी : ०२ ते ०६ वा. देवता स्थापना, जलधिवास, सायं आरती, सामुहिक रामरक्षा,हनुमान चालीसा पठणरात्री भजन संध्या. १) श्री. मनोज चित्रकथी (संगीत विशारद)२) श्री. विजय पालीवाल (संगीत विशारद) ३) श्री. नरेंद्र भावे (संगीत विशारद) यांचा कार्यक्रम होणार आहे.तसेच
रविवार, दिनांक १६/०२/२०२५ रोजी सकाळी : ०८.३० ते १२.३० देवता पुजन, मंदीर स्नपन, मुर्ति स्पपन विधी धान्यअधिवास दुपारी : ०२ ते ०६ मुर्तीन्यास, अवशवन्यास, हवन, दिपोत्सव, सायं. आरती शयदअधिवास संध्या : ०७ ते १०.३० सुंदरकांड (संगीतमय) कथा भजन श्रीराम भक्त हनुमान मंडळ बलवाडी, ता. वरला, जि. बडवाणी (म.प्र.)
सोमवार, दिनांक १७/०२/२०२५ रोजी सकाळी ६.३० ते ११.३० पर्यंत मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, कळसरोहण, ध्वजारोहण देवता पुजन, हवन त्यानंतर दुपारी १२ वाजेपासुन महाप्रसाद भंडारा कार्यक्रम होणार आहे
तरी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त महाविर नगर, बालाजी नगर, राम नगर, एस.टी. कॉलनी रहिवाशांनी केले आहे.