हुतात्मा वीर कन्हैया बंधूंच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेतर्फे अभिवादन
चोपडा(प्रतिनिधी)शिवसेनेचे शिलेदार व लढवय्या हुतात्मा वीर कन्हैया बंधूंच्या 38 व्या स्मृतिदिनानिमित्त आज सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना(उबाठा)व युवासेनेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
हुतात्मा वीर बाळासाहेब कन्हैया तथा हुतात्मा वीर मुरलीधर कन्हैया यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण चोपडा माजी शिवसेना आमदार तथा सूतगिरणी चे चेअरमन बापुसो. कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना उबाठा उपजिल्हा प्रमुख गोपाल चौधरी, तालुका प्रमुख देवेंद्र सोनवणे ,शहरप्रमुख महेंद्र भोई,शशी कन्हैया,महिला शहरप्रमुख जयश्री बडगुजर माजी मनसे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ वानखेडे,ऍड धर्मेंद्र सोनार, मधुकर कन्हैया,शिवदूत सुनील बडगुजर,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर प्रमुख शाम परदेशी,युवासेना उपजिल्हाप्रमुख डॉ रोहन पाटील,भाजपा माजी शहराध्यक्ष मुन्ना शर्मा,सुतगिरणी संचालक तुकाराम पाटील,रमाकांत बोरसे,रामचंद्र भादले, बापू कोळी,किनगाव चे अनिल पाटील,प्रकाश पाटील,सुभाष शिंपी,प्रहार तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, रविंद्र वाडे,पंकज चौधरी,कमलेश बडगुजर,गोरख कन्हैया,बबन कन्हैया,मछिंद्र कन्हैया,गणेश कन्हैया,दिनेश कन्हैया,रावश्या पाटील, तन्मय शिंपी, मनोज माळी,भैय्या कन्हैया, वर्षा कन्हैया,भारती कन्हैया,मंगला कन्हैया, निलीमा कन्हैया, दिपीका पाटील यासह शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते
यावेळी हुतात्मा वीर कन्हैया बंधू प्रतिष्ठान तर्फे उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.तसेच वेले येथील अमर संस्था संचालित बालकाश्रम व वृद्धाश्रम येथे बालकांना तथा वृद्धांना अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
..........................................................................
१३ फेब्रुवारी १९८६ हा दिवस चोपडा शिवसेनेसाठी काळा दिवस ठरला कारण हुतात्मा वीर बाळासाहेब कन्हैया तथा हुतात्मा वीर मुरलीधर कन्हैया पोलीस स्टेशन येथे त्यांचे वर्चस्व सहन न झाल्यामुळे हत्या करण्यात आली परंतु त्यांचे बलिदान व्यर्थ न जाता त्यांच्या रक्तातून हजारो शिवसैनिक उदयास येऊन त्यांनी ३ वेळेस चोपडयात आमदारकी चा भगवा फडकवत हुतात्मा वीर बाळासाहेब कन्हैया तथा हुतात्मा वीर मुरलीधर कन्हैया यांना अभिवादन केले आहे.या पुढे हि (उबाठा)शिवसेनेचा भगवा फडकत राहील हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी शिवसैनिकानी ग्वाही घेतली
..........................................................................