इंग्रजीत षटकार ठोकणारे विद्यार्थी घडविणारा अवलिया कोच "दीपक महाजनसर

 

इंग्रजीत षटकार ठोकणारे विद्यार्थी घडविणारा अवलिया कोच "दीपक महाजनसर"


चोपडा दि.१४(प्रतिनिधी):चोपड्यातील इंग्रजी विषय सोपा करून शिकवणारा अवलिया म्हटलं तर महाजन क्लासेसचे संचालक दीपक महाजन सर   यांचेही  एक नाव पहिल्या यादीत आहे.इंग्रजी व्याकरणाच्या तयारीवर भर देऊन षटकार  मारण्यात विद्यार्थ्यांची अष्टपैलू टीम तयार करणारे  उत्कृष्ट कोच म्हणून त्यांची ख्याती आहे.इंग्रजी हे वाघीणीचे दूध आहे ते पिणारा  विद्यार्थी गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे ध्यानी घेत  महाजन क्लासेस मध्ये जोरदार सराव केला जातो त्यामुळे  क्लासेसची मुले परदेशात डॉक्टर इंजिनियर होण्यापर्यंत मजल गाठत आहेत. इयत्ता दहावी इंग्रजी विषयात 97 गुणांचा नाशिक बोर्डात क्लासेस चा झेंडा रोवला गेला आहे

शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना शिस्त व सामाजिक जोपासना व्हावी याकरता नैतिक मूल्यांची शिकवण देखील मिळत आहे . तालुक्यातील खेड्यापासून ते शहरातील उच्चशिक्षित लोकांची मुले देखील या क्लासेस मध्ये शिक्षण घेत आहेत.सदरील क्लास मध्ये शिस्त ,इंग्रजी व्याकरण, व गुणवत्तापूर्ण निकाल यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा  प्रयत्न केला जातो.विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी दंतचिकित्सा कार्यक्रम ,रक्षाबंधनाच्या वेळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मुलींना घेऊन कर्तव्यदक्ष जवानांना राख्या बांधून सामाजिक जोपासना जोपासली जाते . एवढेच नव्हे विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याकडून अल्प फी किंवा फी न घेता देखील शिक्षण दिले जाते. मागील वर्षी वेले येथील निराधार मुलांना त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांची दिवाळी गोड व्हावी याकरिता दिवाळी फराळ देऊन दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संत तुकाराम म्हणतात जे का रंगले गांजले त्यास म्हणे ,जो आपले  या उक्तीप्रमाणे  समाजाची सेवा साधण्याचा आटोकाट प्रयत्न दीपक महाजन सर  करीत आहेत.
क्लासेस  जी टी एस, इयत्ता दहावी व ओलंपियाड परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी   अग्रक्रमावर आहे. तालुक्यातून खेड्यापाड्यातून  क्लासेसला सर्वाधिक पसंती मिळत आहे तरी ताबडतोब विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन क्लासेसचे संचालक प्राध्यापक दीपक महाजन सर यांनी केले आहे.
गत 18 वर्षापासून क्लासेसने आपले पाय रोवली आहेत छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झाले आहे .मागील वर्षी एस एस सी परीक्षेत इंग्रजी विषयात शंभर पैकी  94 गुण  मिळविणारे सात विद्यार्थी नाशिक बोर्डातून चमकले आहेत तसेच जी टी एस परीक्षेत नाशिक विभागात क्लासचा अव्वल क्रमांक आला आहे. प्राध्यापक दीपक महाजन आपल्या विद्यार्थ्यांना टणाटणा इंग्रजी बोलता यावे व गुणवत्ता यादीत झडकावेत यासाठी जीव ओतून शिक्षण देण्याचे काम करीत आहेत.शिस्त,शिक्षण ,वागणूक याचा सारासार मेळ घालून  क्लासेसच्या भट्टीत मजबूत मडके घडविण्याच्या अनोखे कार्य करीत आहेत.डॉक्टरांची इंग्रजीतून मुलाखत घेण्यात लहानगे विद्यार्थीही  माहिर होऊ लागले असल्याने क्लासेसचे नाव शहरातील कानाकोपऱ्यात पोहचल्याने सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे संचालक श्री.महाजन यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये गरिब श्रीमंत असा ‌कोणताही भेद न करता तो इंग्रजी व्याकरणासह कसा  निष्णांत  होईल याकडे जातीने लक्ष घालून शिकविण्याचे काम ते करतात . वेगवेगळ्या शैक्षणिक चाचण्यांचा माध्यमातून मागच्या रांगेतील विद्यार्थ्यांस पुढे आणण्याचा आटोकाट प्रयत्न श्री.महाजन सरांचा असतो. त्यांच्या क्लासेसचे विद्यार्थी परदेशात नोकरीसाठी स्थाईक झाल्याचे  समाधानही त्यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने