चौगावात आमदारांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन
चौगाव ता.चोपडादि.२२(प्रतिनिधी) येथे नुकतेच चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आन्नासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते साठ लाखांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यात प्रामुख्याने वन विभागातील कामांचा समावेश असून यात विस लाख रुपयात चौगाव ते चौगाव किल्ला व राणी काजल धबधबा पर्यंत खडीकरण करण्यात येणार आहे,दहा लाख रुपये पॅगोडा,दहा लाख रुपये वाचटावर(मचान) ,दहा लाख संरक्षण कठडे व दहा लाख रुपये पर्यटकांसाठी ठिक ठिकाणी बैठक आसन (बाकडे) तसेच दिशा दर्शक व माहिती दर्शक फलकांवर खर्च करण्यात येणार आहेत.
रस्ता खडीकरणामुळे फक्त त्रिवेणी संगम पर्यंत जात होती ती वाहने आता किल्ल्याच्या पायथ्याशी व राणी काजल धबधबा पर्यंत नेता येणार आहेत.तिर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिरासमोर उंच मचान उभे राहील्यावर पर्यटकांना परीसरातील निसर्ग रम्य वातावरण, विविध पक्षी व प्राणी यांचे निरीक्षण करता येणार आहे.तसेच जंगल संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.ठिक ठिकाणी बैठक आसन व पॅगोडामुळे पर्यटकांना विश्रांती घेता येईल.किल्यावर येणार्या पर्यटकांसाठी या मुलभूत सुविधा जिल्हा नियोजन मधून मंजूर करून प्रत्यक्ष भूमिपूजन करण्यात आल्याने फक्त चौगावातूनच नव्हे तर लासुर,सत्रासेन, चुंचाळे व चोपडा सहीत जिल्ह्यातील सर्व दुर्ग प्रेमी संघटनांनी आन्नासाहेबांचे आभार मानले.हजारोंच्या उपस्थित झालेल्या भूमीपूजनाला चौगाव,लासुर, चुंचाळे,चोपडा, क्रुष्णापूर,मामलदे येथील मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी तसेच सहायक उपवनसंरक्षक प्रथमेश हडपे, चोपडा व वैजापूर वनक्षेत्रपाल बी.के.थोरात,वनपाल जयप्रकाश सुर्यवंशी,वनरक्षक अमोल पाटील,शुभम पाटील, प्रकाश पाटील उपस्थित होती.
आन्नासाहेबांच्या प्रयत्नातून लवकरच त्रिवेणी महादेव मंदिराला तिर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळेल व चौगाव किल्ल्याचा विकास होऊन या ऐतिहासिक वारसाचे खर्याअर्थाने संवर्धन होईल अशा अपेक्षा चोपडा तालुकावासींकडून व्यक्त होत आहेत.