हातेड बुद्रुक येथील पुरुषोत्तम नारायण सनेर यांना पत्नी वियोग
हातेड बुद्रुक, ता.चोपडा दि.२०(प्रतिनिधी)येथील रहिवाशी कै.सौ.सुनीता पुरुषोत्तम सनेर वय 69 वर्ष यांचे दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुःखद निधन झाले. त्या हातेड बुद्रुक येथील राज्य पुरस्कारप्राप्त केंद्रप्रमुख व ग. स. सोसायटी जळगावचे माजी संचालक श्री. पुरुषोत्तम नारायण सनेर यांच्या धर्मपत्नी तसेच श्री. मनोजकुमार सनेर व्हॉइस प्रेसिडेंट,अदानी पॉवर लिमिटेड डहाणू , श्री. सचिन सनेर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर, धुळे तसेच प्राध्यापिका डॉ. सौ. सुषमा देसले यांच्या मातोश्री होत्या.