पीएमश्री जि प उच्च प्राथमिक शाळा, कढोली ता एरंडोल शाळेची शैक्षणिक सहल संपन्न..क्षेत्र भेट अंतर्गत चोपडा सूतगिरणी व श्रीक्षेत्र उनपदेव येथे दिली भेट
चोपडा दि.१२(प्रतिनिधी)- पीएमश्री जि प उच्च प्राथमिक शाळा, कढोली ता एरंडोल शाळेची शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत चोपडा तालुक्यातील गरमपाण्याचा झऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र उनपदेव तीर्थक्षेत्र येथे सहल नेण्यात आली. तसेच चोपडा तालुक्याच्या विकासासाठी असलेला महत्वाकांक्षी प्रकल्प तापी सहकारी सूतगिरणी, चोपडा येथे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कापसापासून सुतनिर्मितीचा अनुभव देण्यात आला.
*यावेळी ग स सोसायटी, जळगांव चे अध्यक्ष तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री अजबसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री नंदकुमार अत्रे,श्री स्वप्नील पाटील, श्री कैलास पाटील, श्री शुभम चौधरी, श्रीमती वैशाली वाल्हे, श्रीमती संगीता देशमुख, श्रीमती अलका पाटील या सहकारी शिक्षक बंधु-भगिनींचे स्वागत सूतगिरणीचे चेअरमन मा आमदार बापुसो श्री कैलास पाटील,संचालक श्री संजय उत्तमराव पाटील, ग स संचालक श्री मंगेश भोईटे, श्री योगेश सनेर,सूतगिरणीचे कार्यकारी संचालक श्री पांडे साहेब व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.*
ग स सोसायटी, जळगांव चे संचालक श्री योगेश सनेर, श्री मंगेश भोईटे, ग स सोसायटी म, जळगांव च्या चोपडा शाखेचे श्री जगन्नाथ बाविस्कर,श्री संजय उत्तमराव पाटील, श्री शरद पाटील, श्री स्वप्नील सोनवणे,श्री उज्वल शिंदे, श्री जितेंद्र सुर्यवंशी, श्री राहुल गोड यांचे वतीने विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.*