चोपडा येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

 चोपडा येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

चोपडा दि.१२(प्रतिनिधी)दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ वार शनिवार रोजी "महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित" श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग&पॉलिटेक्निक) चोपडा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी सदरील मेळाव्यात बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी बायोडाटा सह सर्व ओरिजनल शैक्षणिक कागदपत्रे व पासपोर्ट फोटो दोन झेरॉक्स संच घेऊन उपस्थित रहावे तसेच दिलेल्या या रजिस्ट्रेशन लिंक https://forms.gle/VdZCyeehhk5Bj3jY6 वरती किंवा खाली दिलेल्या क्यू आर कोड वर स्कॅन करून आपली सविस्तर माहिती भरून द्यावी या मेळाव्यात नामांकित कंपन्या जसे बजाज, मारुती सुझुकी, किर्लोस्कर अशा विविध कंपन्यांचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी उपस्थित राहतील. या मेळाव्यात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार विविध कंपन्यांमध्ये मुलाखतीसाठी संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी तयारी करून या मेळाव्यात भाग घेणे महत्वाचे आहे, ज्यामुळे त्यांना रोजगार मिळविण्याची शक्यता वाढेल. सदरील मेळाव्याचे आयोजन तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री व्ही एन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्री भूषण जे पवार यांनी केलेले आहे तरी महाविद्यालयामार्फत आव्हान करण्यात येते की जास्तीत जास्त युवकांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा व संधीच सोनं करावं. असे आवाहन आयोजकांनी केले आहे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने