ग्रामपंचायत व जि.प.शाळेतर्फे शिक्षक दिलवरसिंग पावरा यांचा सत्कार

  ग्रामपंचायत व  जि.प.शाळेतर्फे शिक्षक दिलवरसिंग पावरा यांचा  सत्कार 

बोराडी,ता.शिरपुर दि.२७(प्रतिनिधी):- शिरपूर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेले गदडदेव येथील श्री.दिलवरसिंग गुलाब पावरा यांची नुकतीच जि.प. शाळा रोलसिंग पाडा (ग्रामपंचायत फत्तेपूर फारेस्ट) येथे शिक्षक म्हणून पुन्हा नव्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या बद्दल त्यांचे ग्रामपंचायत व जि.प. शाळा गदडदेव तसेच ग्रामस्थांकडुन पाडवी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. 

या वेळी अध्यक्ष स्थानी बिरसा ब्रिगेड चे श्री.रोहिदास पाडवी होते तसेच श्री.जगदिश डुडवे (मुख्याध्यापक जि.प.शाळा गदडदेव) श्री.जे.पी.पावरा (ग्रामविस्तार अधिकारी) श्री.सचिन गवळी (तलाठी)  निकिता पावरा(कृषी अधिकारी) श्री.आत्माराम अहिरे (सरपंच) श्री.अनिल पाडवी(पोलीस पाटील) श्री.रविभाऊ शिरसाठ (पत्रकार) श्री.मंगल पावरा, श्री.सखाराम पावरा,श्री. शांतीलाल पटले, बाबु ठाकरे सौ.इंदुबाई ठाकरे(ग्रामपंचायत सदस्या) यांनी पाडवी यांचा सत्कार केला यावेळी ग्रामपंचायत शिपाई, आपरेटर, जि.प.शाळेचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने