प्रजासत्ताक दिनी कै. हि मो करोडपती माध्यमिक विद्यालयात "सुंदर आई टॅलेंट सर्च परीक्षा-2025"" चे पारितोषिक वितरण
*❇️26 जानेवारी प्रजासत्ताक दिन विदयालयात विविध कार्यक्रमानी साजरा*
🔵चोपडादि.२७(प्रतिनिधी)प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 13 जानेवारी 2025 रोजी आमच्या पूज्य साने गुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ, चोपडा संचलित कै हि मो करोडपती माध्यमिक विद्यालय, चोपडा तसेच कै.ओं गो पाटील माध्यमिक विद्यालय,कुंड्यापाणी-बिडगांव ता चोपडा या संस्थेच्या दोन्ही विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा बाबत जाणीव निर्माण होणे साठी तसेच सामान्य ज्ञानाची संपादणूक पातळी समृद्ध होऊन, अवांतर वाचनाची आवड निर्माण होणेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ दिपक पाटील यांच्या संकल्पनेतून ""सुंदर आई टॅलेंट सर्च परीक्षा-2025"" घेण्यात आली. यात इयत्ता-5 वी ते इयत्ता-10 वी मध्ये प्रथम-द्वितीय-तृतीय आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपल्या संस्थेचे संस्थापक, सचिव, उपाध्यक्ष श्री व्ही एच करोडपती सर, श्री सुनिल चौधरी सर (से. नि. अधीक्षक-शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह) तसेच मुख्याध्यापक मंगेश भोईटे, आर आर बडगुजर, ए पी बडगुजर, श्रीमती सी पी बडगुजर, श्रीमती व्ही बी साळुंखे, श्रीमती पी सी बडगुजर मॅडम, श्रीमती मिना पाटील मॅडम,श्रीमती दिपाली बडगुजर मॅडम, श्रीमती शर्मिला बडगुजर मॅडम शिक्षक बंधु-भगिनी यांचे शुभहस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजोग साळुंखे, अशोक बडगुजर, सुनिल बडगुजर, विलास सनेर, गणेश बडगुजर, श्रीमती ममता पाटील आदींनी सहकार्य केले.*