शिवसेना तर्फे भारत माता व संविधान पूजन सोहळा संपन्न

 शिवसेना तर्फे भारत माता व संविधान पूजन सोहळा संपन्न 


चोपडा (प्रतिनिधी )उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दि. 25 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भारत माता व संविधान पूजन सोहळा संपन्न झाला. चोपडा शहरातील तिरंगा चौकात मराठा रेजिमेंट चे  मेजर रवी हरणे तथा महा रेजिमेंट चे शरद घाटे या आर्मी जवानांच्या हस्ते भारत मातेचे पूजन आणि भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले.शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या समवेत भारत मातेचे व संविधानाचे पूजन करून अतिशय उत्साहात संपन्न झाला. भारत मातेच्या जयघोषाने सर्व परिसर दुमदुमला होता यावेळी शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र सोनवणे यांनी भारतीय संविधानाचे वाचन करून पदाधिकारी सोबत शपथ घेतली 

     याप्रसंगी तालुका संघटक अनिल पाटील,महिला शिवसेना शहर प्रमुख जयश्री बडगुजर, शहर प्रमुख शशी कन्हैया,महेंद्र भोई, युवा उपजिल्हा प्रमुख डॉ. रोहन पाटील, जेष्ठ शिवसैनिक सुनिल बडगुजर,बाळू कोळी,सुभाष शिंपी,पंचकचे सुभाष पाटील,कमलेश बडगुजर,पंकज चौधरी,चेतन लोहार,प्रविण लोहार, आकाश सोनवणे,दिपक पारधी,राज भिल, योगेश निकाळजे, भरत पाचवणे, सुनिल पाचवणे,रावश्या पाटील, मनोज महाजन,अनिल भोई यासह शिवसैनिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने