प्रजासत्ताक दिनी गणपुर येथे विविध संस्थांमध्ये ध्वजारोहण, विकास विद्यालयात बक्षीस वितरण
गणपूर ,ता चोपडा दि.27(प्रतिनिधी):येथे मोठ्या आनंदात 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त विविध संस्थांमध्ये संस्था पदाधिकाऱ्यांनी ध्वजारोहन केले. सुरुवातीला विकास माध्यमिक विद्यालय व पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढत विविध घोषणा दिल्या.यावेळी अनेक विद्यार्थी देशभक्त व थोर सेनानींच्या भूमिकेत दिसून आले.
ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था, पिक संरक्षण संस्था, नारायण नाना दूध सहकारी संस्थेत गावाच्या मुख्य चौकात एकाच वेळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ऍड .बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचवेळी प्रांगणात असलेल्या स्काऊट ध्वजाचेही विद्यार्थिनींच्या हस्ते पूजन करून स्काऊट ध्वज फडकविण्यात आला.स्काऊट शिक्षक ए बी सूर्यवंशी यांनी स्काऊट ऑर्डर दिली. विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी यावेळी संविधान प्रतिज्ञा म्हटली. त्यानंतर विकास माध्यमिक विद्यालयात परेश पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विविध सांस्कृतिक गीत व संविधानावर आधारित नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. शाळेत नुकत्याच पाच पार पडलेल्या स्काऊट गाईडच्या हिवाळी शिबिरातील विविध स्पर्धा व सजावटीत क्रमांक मिळवलेल्या गटांना एम बी पाटील,ऍड. बाळकृष्ण पाटील,सरपंच भूषण गायकवाड,पोलीस पाटील रत्नाबाई पाटील,जितेंद्र वानखेडे, परेश पाटील, ईश्वर पाटील, राजेंद्र पारे, मुख्याध्यापक पी एस पाटील पर्यवेक्षक डी पी पाटील,यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमांना विविध संस्थांचे पदाधिकारी व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर टी सावकारे यांनी केले........