रेसिड्यू फ्री किचन गार्डन आणि किचन मेंटेनन्स चा कुटुंबाच्या आरोग्याशी संबंध..डॉ. प्रशांत राजपूत यांचे मत

 रेसिड्यू फ्री किचन गार्डन आणि किचन मेंटेनन्स चा कुटुंबाच्या आरोग्याशी संबंध..डॉ. प्रशांत राजपूत यांचे मत 


चोपडा...कार्यक्रमात माहिती समजून सांगतांना डॉ प्रशांत राजपूत.


गणपूर,ता.चोपडा, ता :27(प्रतिनिधी) घातक कीटकनाशके, जबाबदार कृषी पद्धतीमुळे स्वयंपाक घरात क्रोनिक किडनी डिसीजेस घरात प्रवेश करतात आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अत्यंत घातक कीटकनाशकांच्या वापरामुळे जिल्हे व गावांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून कर्करोग आणि सी के डी सह विशिष्ट आरोग्य समस्यांची रसायने जोडलेली असून शेतकरी आणि ग्रामीण स्त्रिया या समस्यांसाठी असुरक्षित झालेल्या आहेत. असे मत मुंबई येथील किडनी ट्रान्सप्लांट सर्जन नेफरोलॉजिस्ट आणि अरण्य फार्म्स द्वारे पुनरुत्पादक शेतीचे प्रवर्तक डॉ. प्रशांत राजपूत यांनी चोपडा येथे शरदचंद्रिका आक्का पाटील नगरपालिका नाट्यगृहात आयोजित महिला कामगारांचे राहणीमान सुधारण्यासाठी आणि ग्रामीण महिलांसाठीच्या सरकारी योजना बद्दल जागृती येण्यासाठी आयोजित विशेष प्रशिक्षणात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना मांडले. अवशेष मुक्त किचन गार्डन्स राखणे गरजेचे असून विविध भागांमध्ये रासायनिक मुक्त उत्पादनाची लागवड करण्यासाठी महिला प्रयत्न करू शकतात .त्याचप्रमाणे किराणा दुकानातून खरेदी केलेल्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या लपलेल्या धोक्याबद्दलही  डॉ राजपूत यांनी जनजागृती केली. निरोगी स्वयंपाक घर सुनिश्चित करण्यासाठी स्टोअर्स मधून खरेदी केलेल्या उत्पादनांपेक्षा घरगुती वस्तूंना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील कॅन्सर आणि सीकेडी प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून येत्या वर्षात अफ्रो-बीसीआय आणि  समविचारी संस्थांसोबत संयोगी उपक्रम राबऊन परिसरातील ग्रामीण महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे सुरू करण्याचा मनोदय ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी माविम चे संयोजक सलीम तडवी यांनी एमएसआरएलएम, माविम ,कृषी विभाग, नगरपरिषद आणि राष्ट्रीयकृत बँकांमार्फत ग्रामीण महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. प्रशिक्षणासाठी विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह साडेपाचशे महिला, 35 ग्रामस्तरीय स्वमन्वय समिती सदस्य, लिंग समिती महिला सदस्य आणि 21 सीआरपी नेत्या महिलांनी सहभाग घेतला........



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने