साहील च्या मृत्यूने परिसरात हळहळ

 

साहील च्या मृत्यूने परिसरात हळहळ*


शिंदखेडा साहिल चे असे अचानक निघून जाणे कुटुंबासाठी व गावासाठी  खूप मोठी पोकळी निर्माण झाली जी कधीच न भरणारी आहे. साहिल चे आजोबा बाबू घमा शेख हे रंजाने गावाला वास्तव्यास होते. धर्मराज पाटील (पमा आण्णा)यांच्या चक्कीवर काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतें. गावात फक्त मुस्लिम समुदायाची चारच घरी ज्यात कधी ही कोणासोबत भांडण नाही तंटा नाही.गावात कधीच कोणासोबत हिंदू मुस्लिम म्हणून वागले नाही. गावातील प्रत्येक समुदायासोबत त्यांचे चांगले  संबंध होते. आणि खूपच प्रेमाने ते  गावात आपले वास्तव्य करत होते. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत होते गावात खूप चांगल्या प्रकारे भाईचारा त्यांनी ठेवला होता. परंतु त्यांचा मुलगा नासिर दादा यांना कामानिमित्ताने गाव सोडून धुळे येथे जावे लागले.  नाशिर दादा मिस्तरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्याचबरोबर साहिल देखील त्यांना मिस्तरी कामात मदत करत होता. साहिल चे अवघे 21 वर्ष वय होते. मागच्या महिन्यात साहिल चे लग्न झाले होते. आणि अशा तारुण्य वयात असं अचानक निघून जाणं  हे नाशिर दादा यांचा कुटुंबावर व रंजाने गावावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात ही बातमी २६ जानेवारी ला पहाटे ४:००वा. माहीत झाल्यावर रंजाने गावातील व  पंचक्रोशीतील शेकडो हिंदू बांधव  साहिलच्या अंत्ययात्रेसाठी धुळ्यात दाखल झाले. कारण साहिलच्या आजोबांचे वागणं साहिलच्या वडिलांचे वागणं हे खूप वेगळे होते. आणि खूप जिव्हाळा त्यांचा लोकांसोबत होता. म्हणून गावात आजपर्यंत कुणाची कधीही न भांडता गुण्यागोविंदाने प्रेमाने गावात वास्तव्य केले. साहिल चे आजोबा बाबू घमा शेख हे देखील असेच 26 जानेवारीला आपल्यातून आचानक निघून गेले होते. आणि आज साहिल देखील 26 जानेवारीला आपल्यातून अचानक निघून गेला. गावात शोककळा पसरलेली आहे
आहे. साहिलचा एक लहान भाऊ आहे जो धुळ्यात शिक्षण घेत आहे. याच्यावर घराची पूर्ण जबाबदारी येणार आहे. या दुःखाच्या काळात गाव म्हणून आम्ही नेहमीच कुटुंबाच्या पाठीशी आहोत. या क्षणी शेख परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यातून त्यांना बाहेर येण्याची *ताकद* भगवंताने द्यावी समस्त गाव करी म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत....
*श्री.रविभाऊ शिरसाठ रंजाणेकर*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने