आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर.. विविध समस्यांवर टाकला प्रकाश झोत .. मंत्री रक्षाताई खडसे यांचीही प्रश्नांवर प्रश्न सरबत्ती


आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर.. विविध समस्यांवर टाकला प्रकाश झोत .. मंत्री रक्षाताई खडसे यांचीही प्रश्नांवर प्रश्न सरबत्ती 

जळगाव दि.६(प्रतिनिधी):  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची आढावा बैठक जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात संपन्न झाली यात  चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी अनेक समस्यांवर दूर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत झाडाझडती घेतली.त्यावर तत् फम् उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनीही प्रश्नांवर प्रश्न सरबत्ती करून जोरदार हिसका दाखविल्याने सभा चांगलीच गाजली.

बैठकीत आमदार प्रा चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याच्या चोपडा व यावल तालुक्यातील रस्त्याच्या लांबीच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक श्री. शिवाजी पवार यांना जाब विचारला ,तसेच निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा पी.एम.के.एस. वाय  अंतर्गत समावेश करणेबाबत पाठपुरावा करावा व या प्रकल्पांतर्गत चोपडा तालुक्यातील पुनऀवसीत गावांना पायाभूत सुविधा पुरविण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी चोपडा येथे एक बैठक आयोजित करावी अशी मागणी केली , प्रस्तावित यावल उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक मार्फत शासनाकडे पाठविण्यासाठी उपसा सिंचन मंडळ नाशिक येथील उपसमितीच्या बैठकीत सुचविल्या प्रमाणे परिगणके निश्चित करण्यात येऊन स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी घेऊन तो अहवाल तात्काळ शासनाकडे सादर करणेसाठी सत्वर पाठपुरावा करणेबाबत अधिक्षक अभियंता श्री. यशवंतराव भदाणे यांना सुचना केली.  चोपडा मतदारसंघातील रखडलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत योजना तात्काळ पूर्ण करणे बाबत सुचना केली. चोपडा मतदारसंघातील अपुणऀ घरकुल तात्काळ पूर्ण करुन घ्यावेत तसेच घरकुलांसाठी  गावठाण जागेअभावी ज्या गावातील  लाभार्थी वंचित राहत असतील त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींकडुन गावठाण विस्ताराचे व जागा मागणीचे प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ मागविण्यात यावेत व जिल्हाधिकारी साहेबांची मंजुरी घ्यावी. मालोद आदिवासी आश्रमशाळेत जाण्यासाठी जोडरस्ता उपलब्ध करुन द्यावा असे सुचित केले. 

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना.  रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे,खा. स्मिताताई वाघ आ. राजुमामा भोळे,आ. अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ,जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत , महापालिका आयुक्त ढेरे , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र लोखंडे तसेच सर्व यंत्रणांचे खाते प्रमुख उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने