दिशा फाऊंडेशन तर्फे "दिशा मॅरेथॉन - २०२५" भव्य स्पर्धा १२ जानेवारीला.. प्रथम बक्षीस ५ हजारांचे

 दिशा फाऊंडेशन तर्फे  "दिशा मॅरेथॉन - २०२५" भव्य स्पर्धा १२ जानेवारीला.. प्रथम बक्षीस ५ हजारांचे

चोपडा दि.५(प्रतिनिधी)येथील दिशा फाऊंडेशन तर्फे  दिशा मॅरेथॉन - २०२५ स्पर्धा रविवार दि.१२ जानेवारी  रोजी सकाळी ६.०० वा. आयोजित करण्यात आली आहे.सदरील स्पर्धेचा शुभारंभ  ग्रामीण पोलीस स्टेशन चौक येथून होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक, धरणगांव नाका, भारव्दाज ट्रेडर्स, पंकज स्टॉप पासुन त्याच मार्गाने परत असा मार्ग ठरविण्यात आला आहे.

महिला गटांसाठी (३ कि.मी.)तर पुरुष गट (५ कि.मी.) अंतर असणार आहे.त्यात प्रथम बक्षीस : 5000/-रु.व्दितीय बक्षीस : 3000/- रु.तृतीय बक्षीस : 2000/- रु.असे रोख बक्षीस प्रति गट ठेवण्यात आले आहे.प्रवेश फी विद्यार्थ्यांसाठी 150 रु.,इतर सर्वांसाठी: 200 रु.ठेवण्यात आली असून त्यात टी-शर्ट, मेडल व रिफ्रेशमेंट देण्यात येणार आहे नाव नोंदणीची अंतिम मुदत  ८ जानेवारी २०२५ आहे.

स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी  नाव नोंदणीसाठी पुढील ठिकाणी संपर्क साधावा (ऑनलाईन व ऑफलाईन).....दिशा फाऊंडेशन, नारायण वाडी, चोपडा (मो. 8275266851) , शारदा ज्युनिअर क्लासेस, पंकज शाळेजवळ, चोपडा (मो. 7385529129) , विधीज कॉम्प्युटर्स, ग्रामीण पोलीस स्टेशन समोर, चोपडा (मो.9765226840),  शाम झेरॉक्स, छ. शिवाजी महाराज चौक, चोपड़ा (मो.9822241692), उमंग प्लाय, बापूजी कॉम्प्लेक्स जवळ,चोपडा(मो.9890024109)

स्पर्धा यशस्वीतेसाठी राजेंद्र पाटील ,राजाराम पाटील, डॉ. भरत पाटील, नरेंद्र पाटील ,पियुष चौधरी, आरिफ मिस्तरी, जितेंद्र शिंपी ,आशुतोष पाटील ,श्याम परदेशी ,हितेंद्र साळी ,नंदकिशोर देशमुख सर आदींचे सहकार्य लाभत आहे.

तरी जास्तीत जास्त स्पर्धकांना सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने