विवेकानंद विद्यालयात शिक्षक राकेश विसपुते यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी साकारली.. सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित दहा बाय पाच फुटाची हस्तलिखित भित्तिपत्रिका

विवेकानंद विद्यालयात शिक्षक राकेश विसपुते यांच्या संकल्पनेतून  विद्यार्थ्यांनी साकारली.. सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित दहा बाय पाच फुटाची हस्तलिखित भित्तिपत्रिका 

चोपडा दि.५(प्रतिनिधी ) येथील विवेकानंद विद्यालयात मराठी विषय नवोपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयातील इयत्ता सहावी सातपुडा गटातील 49 विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक राकेश विसपुते यांच्या संकल्पनेतून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारी दहा फूट लांब व पाच फूट रुंद अशी भव्य हस्तलिखित भित्तिपत्रिका साकारली. माझी शाळा माझा अविष्कार या आशियाखाली गटातील सर्व विद्यार्थ्यांनी विविध लेखन साहित्य, सावित्रीबाईंचे चित्र काढून आणलेत व त्याची सुरेख मांडणी या भित्तिपत्रिकात करण्यात आली. 

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व प्रतिमा पूजन करून या भितीपत्रिकेचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक व संस्थेचे विश्वस्त नरेंद्र भावे, उपमुख्याध्यापक पवन लाठी व उपस्थित सर्व शिक्षकवृंद यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी वेशभूषा सादर केल्या. विविध विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व कविता सादर केल्या. उपशिक्षिका राजेश्वरी भालेराव यांनी साध्या सोप्या भाषेत सावित्रीबाई फुले यांच्या विषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपशिक्षक जावेद तडवी यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने