हेंद्रूण विद्यालयात ७६वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा
धुळे दि.३०(प्रतिनिधी)सर्वोदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हेंद्रूण-मोघण ता.जि.धुळे येथे २६जानेवारी २०२५ रोजी ७६वा गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..या कार्यक्रमाला अध्यक्ष नामांकित डॉक्टर सुशीलकुमार नवसारे हे लाभले..त्यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले व राष्ट्रीय ध्वज फडकवून सलामी देण्यात आली..
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संस्थेच्या अध्यक्षा अक्कासाहेब सरस्वतीबाई नामदेवराव मासरे यांची होती.त्यांच्या सोबत धर्मराज नवसारे,काकासाहेब सोनवणे, संचालक मंडळ..संस्थेचे मार्गदर्शक श्री. संजीवजी मासरे, हेंद्रूण-मोघण गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते..
सर्व प्रथम गावात प्रभातफेरी काढण्यात आली आणि ग्रामपंचायत कार्यालयात जि.प.मराठी शाळा हेंद्रूण येथील विद्यार्थ्यांसोबत ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले.. येथे भारतीय विविध राज्यांतील वेशभूषेतील विद्यार्थिनींनी नृत्य केले..शालेय पटांगणात आल्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य श्री.एम.एफ माळी सरयांनी केली .मान्यवरांकडून शालेय स्पर्धेतील विविध पारितोषिक वितरण करण्यात आले..
या मध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै.दादासाहेब नामदेवराव धोंडूजी मासरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित रंगभरण स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धा ,एलिमेन्टरी व एंटरमिजीएट परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी,धुळे तालुका विज्ञान स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी,बोरकुंड गावातील शाळेत वकृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी हे सर्व विद्यार्थी आज सन्मानचिन्ह (माळी महासंघ,हेंद्रूण यांच्या कडून) तसेच प्रमाणपत्राने* सन्मानीत करण्यात आले..इ १०वी १२वी च्या बोर्डाच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड . यांच्या कडून देण्यात आले..
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष स्थान असलेले आदरणीय डाॅक्टर सुशीलकुमार नवसरे यांनी विद्यार्थ्यांना मोलाच मार्गदर्शन केले..या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.आर.डी.राजपूत सर तसेच सहकारी शिक्षक श्री डी.एन.पाटील सर, श्री आर जे मगर सर यांनी केले.. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसोबत गावातील ग्रामस्थ उपस्थित होते..तसेच प्राचार्य, पर्यवेक्षक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात परिश्रम घेतले..