चोपडा नगरपालिकेस मिळाली नवीन अग्निशमन गाडी..आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे हस्ते चाबी सुपूर्द
चोपडा दि.२९(प्रतिनिधी) येथील नगरपालिकेसाठी एक लहान अग्निशमन गाडी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रतिकात्मक चाबी देऊन चोपडा न.पा.च्या कर्मचारी यांना सुपुर्द करण्यात आली.
चोपडा शहरात काही भागात निमुळत्या गल्ली असल्याने या भागांमध्ये अचानक आग लागल्यास भयानक परिस्थिती निर्माण होते तिथे मोठ्या गाड्यांना जागा नसते परिणामी जबर नुकसान होते .या गंभीर बाबींवर लक्ष केंद्रीत करत आमदार प्रा चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी लहान अग्नी शमन गाडी चा प्रश्न मार्गी लावला आहे.चोपड्यासह जळगाव जिल्ह्यात जवळपास सहा गाड्या उपलब्ध झाल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत अ व ब नगरपालिका क्षेत्रात निमुळत्या गल्लीत आग लागल्यास मोठ्या अग्नीशामक गाड्यांना आग विझवतांना अडचणी येत असल्यामुळे सर्व सुविधायुक्त लहान अग्निशमन गाड्या वाटप करण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खा. स्मिताताई वाघ, माजी मंत्री अनिल पाटील, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब हे उपस्थित होते.