चोपडयात ३१जानेपासून ४ दिवसीय भव्य रोटरी उत्सव ..जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या शुभहस्ते उद्घाटन
चोपडा दि.२९(प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ चोपडाच्यावतीने दि.31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 6 वाजता खान्देश प्रेस परिसर, हरेश्वर मंदिर रोड,मालती हॉस्पिटल जवळ, बी. एड. कॉलेज समोर भव्य रोटरी उत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी विधानसभापती प्रा. श्री. अरुणभाई गुजराथी हे भूषविणार आहेत तर उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व रोटे. राजिंदरजी खुराणा(प्रांतपाल RID 3030)हे करणार आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटे. राजेंद्रजी भामरे(माजी प्रांतपाल, RID 3030),रोटे. डॉ. राजेशजी पाटील (भावी प्रांतपाल, RID 3030) हे उपस्थित राहणार आहेत.तसेच विशेष अतिथी म्हणून रोटे. अभिजितजी भांडारकर(सह प्रांतपाल, RID 3030),श्री. चंद्रहासभाई गुजराथी(चेअरमन - चोपडा पिपल्स बँक), श्री. मांगीलालजी एल. सौंदाणकर, श्री. युवराजजी ता. जैसवाल हे मान्यवर उपस्थिती देणार आहेत.तरी या उत्सवाचा लाभ जनतेने मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन रोटे. प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर (अध्यक्ष- रोटरी क्लब ऑफ चोपडा),रोटे. भालचंद्र पवार(मानद सचिव - रोटरी क्लब ऑफ चोपडा),रोटे. नितीन अहिरराव(सह प्रकल्प प्रमुख - ),रोटे. अविनाश पाटील(सह प्रकल्प प्रमुख )रोटे. आशिष जैसवाल(प्रकल्प प्रमुख ),रोटे. विलास पी. पाटील(सह प्रकल्प प्रमुख उत्सव ),रोटे. चंद्रशेखर साखरे,(सह प्रकल्प प्रमुख )रोटे. विश्वास दलाल (कोषाध्यक्ष ),रोटे. विलास कोष्टी(सह प्रकल्प प्रमुख - )रोटे. धूमिल अग्रवाल (सह प्रकल्प प्रमुख )रोटे. प्रदीप पाटील (कोषाध्यक्ष - रोटरी क्लब ऑफ चोपडा) यांनी केले आहे.