ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन व धनवाडी येथील संकल्प सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने..मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर संपन्न


ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन  व धनवाडी येथील संकल्प सेवा फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने..मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर संपन्न 

चोपडा दि.५(प्रतिनिधी)काल दि.४ जानेवारी२०२५ शनिवार रोजी घोडगाव ता. चोपडा येथे नामदार गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन पाळधी तथा संकल्प सेवा फाउंडेशन धनवाडी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल ( नवी मुंबई ) संयुक्त विद्यमानाने  आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. 

या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिरास अनेर परिसरातील वेळोदे, घोडगाव ,कुसुंबे, वढोदा,वाळकी या गावातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग होऊन लाभ घेतला. या या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ४६ पेशंट ऑपरेशन साठी पनवेल नवी मुंबई येथे रवाना करण्यात आले. 

या  शिबिराचे आयोजक  सुनील भाऊ कोळी,   मुकेश कोळी,  गोपाल भोई, अक्षय पारधी, किरण भोई ,डॉ बी आर पाटील, नितीन जैन ,डॉ कोळी ,  अशोक पवार वेळोदे तसेच  भूपेंद्र वाघ  जयेश भोई, डॉ. राहुल चौधरी, डॉ. राहुल पाटील यांच्या टीम सह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने