भडगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनी विविध कार्यक्रम

 

भडगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनी विविध कार्यक्रम 

भडगाव दि.५(प्रतिनिधी)तालुका पत्रकार संघाच्या वतीने 6 जानेवारी आदरणीय बाळ शास्त्री जांभेकर यांची जयंतीनिमित्ताने (पत्रकार दिवस) दरवर्षी विविध उपक्रम विविध उपक्रम घेण्यात येतात . यावर्षीही सकाळी विविध क्षेत्रातील तीन उत्कृष्ट कार्य केलेल्या तीन नागरिकांचा सन्मान तर 6 रोजी सायंकाळी 8 वाजता शेतकरी संघ प्रांगणावर राष्ट्रीय पारितोषिक विजेते निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर स्वागत तोडकर यांचे औषधाविना आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 

 यापूर्वीही वस्ती शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वेटर व पादत्राणे चप्पल वाटप, शैक्षणिक उपक्रमात चित्रकला, निबंध स्पर्धा, आरोग्य शिबिर, शासकीय स्तरावरील विविध कर्मचाऱ्यांचा सन्मान तर विविध क्षेत्रात सामाजिक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नागरिकांचा सन्मान सत्कार पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आलेला आहे. यंदाही क्रीडा क्षेत्रात भारतभर मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत असलेले पांढरे येथील रवींद्र सूर्यभान पाटील या खेळाडूचा सन्मान करण्यात येत आहे.  त्यांनी 175 क्रीडा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन 100 हून अधिक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे. मिळवलेल्या बक्षीसातून जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना ते आर्थिक मदत करत कुटुंबाचा उदरनिर्वाह रवींद्र पाटील करतात. या खेळाडूने ग्रामीण भागातून देशभर पांढरद व भडगाव चे नाव नावारूपाला आणले आहे .तसेच येथील गिरणा नदी पात्रामध्ये कुष्ठरोगाने बाधित असलेल्या कुटुंबातील एका बेसारा पंधरा दिवसाच्या चिमुकलीला कोणताही गाजावाजा न करता मायेचा पाझर व दातृत्व दाखवत घरी कुटुंब व मुले असताना दत्तक घेतलेल्या सुमनबाई सुरेश महाजन या मातेचा सन्मान . तर भडगाव शहरातील मुलांना स्पर्धा परीक्षा व नोकर भरतीत अधिक यश संपादन करता यावे चांगला अभ्यास करता यावा यासाठी नगर परिषदेस वाचनालय व अभ्यास वर्गासाठी जागेचे दान करणाऱ्या सचिन चोरडिया यांचा सन्मान सत्कार ६ जानेवारी रोजी लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालय येथे सकाळी १० वाजता विविध  मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.   कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे,  उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल, चाळीसगाव, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे,शितल सोलाट तहसीलदार भडगाव, रवींद्र लांडे मुख्याधिकारी भडगाव, के बी अंजने गटविकास अधिकारी भडगाव, गणेश पाटील सहाय्यक अभियंता बांधकाम विभाग भडगाव, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, उप अभियंता पाटबंधारे पी टी पाटील, तालुका कृषी अधिकारी दिगंबर तांबे, सुशील खरात उपविभागीय अधिकारी बांधकाम विभाग जिल्हा परिषद , प्रा. सुनिल पाटील, निवृत्त प्राचार्य भडगाव, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन विजय महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ, डॉक्टर पंकज जाधव, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय भडगाव, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गणेश भास्कर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गणेश मस्के, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे तसेच विविध अधिकारी कर्मचारी मान्यवर उपस्थित राहणार आहे. यादरम्यान काही पत्रकार पाल्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सायं -७:३० वा. सुप्रसिद्ध निसर्गोउपचारतज्ञ स्वागत तोडकर  यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तरी शेतकरी संघ प्रांगण, भडगाव तेथे नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भडगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने