तालुकास्तरीय शासकीय कर्मचारी खेळांत बुद्धिबळ-कॅरम स्पर्धेमध्ये आरोग्य विभागाचे वर्चस्व
चोपडा दि.४(प्रतिनिधी)सालाबादप्रमाणे आजपासून जिल्हा परिषद तथा पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय विभागांतील सर्व अधिकारी तथा सर्व (पुरुष-महिला) कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तालुकास्तरीय विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.आजच्या सदर खेळामध्ये आरोग्य विभागाचा दबदबा राहिला.उद्या दिनांक-५ जानेवारी२०२५ सकाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आज महात्मा गांधी कॉलेज चोपडा येथील क्रीडांगणात तथा ऑक्सफर्ड इंग्रजी माध्यमिक विद्यालय येथील क्रीडागृहात शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून विविध खेळांचे आयोजन करण्यात आले, सदर खेळाचा शुभारंभ हा तालुका शिक्षण अधिकारी-श्रीम.कविता सुर्वे मॅडम यांच्या हस्ते विविध प्रकारच्या खेळांचा शुभारंभ करण्यात आला.
थोडक्यात खालीलप्रमाणे आरोग्य विभागाचे काही खेळाळूनी यश मिळवले.
१) प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद येथील आरोग्य सेवक-संतोष विष्णू भांडवलकर यांनी अंतीम फेरीमधील बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्रथम क्रमांक पटकावला,
२) प्राथमिक आरोग्य केंद्र-चहार्डी येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी-श्रीम.रिना माळी यांचा १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महिलामधून प्रथम क्रमांक, तसेच
३) प्राथमिक आरोग्य केंद्र-वैजापूर येथील डाटा ऑपरेटर-निलेश सोनवणे यांनी कॅरमच्या खेळात प्रथम क्रमांक पटकावला.
वरील व इतर सर्व विजेत्या कर्मचारी खेळाळुंना जळगांव येथील पंच तथा बुद्धिबळ खेळाचे आरबीटर संजय पाटिल,ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुलचे क्रिडा शिक्षक तथा कॅरम खेळाचे पंच-भुषण गुजर, मुस्तफा अँग्लो हायस्कूलचे क्रीडा शिक्षक-शोएबखान,बॅटमिटंन प्रशिक्षक-अमित डुडवे, श्रीम.क्रांती मॅडम,गट शिक्षण अधिकारी श्रीम.कविता सुर्वे मॅडम,यांच्या हस्ते सर्वच विजेते कर्मचारी यांना.. पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
प्रसंगी विस्तार अधिकारी-आर.टी.सेंदाणे, वैद्यकीय अधिकारी-डॉ.नितीन अहिरे, समुदाय आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी वर्ग, पंचायत समिती कर्मचारी, केंद्र प्रमुख-देवेंद्र पाटिल सर, विजय देशमुख, मिलिंद पाटिल, विनोद पवार, डॉ. महेंद्र पाटील, मनोहर सोनवणे सर, आर.एस.पाटील, मयूर सोनवणे, आर.एम.मडावी, आर.बी.नेहरकर, भालचंद्र ठाकरे सर, व सर्व शिक्षक वर्ग यांनी सहभाग घेतला व सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग हे उपस्थित होते.