पर्यावरण संवर्धन काळाची गरज - डॉ. नंदिनी वाघ
चोपडा दि.२०(प्रतिनिधी) : पंकज कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा येथे भूगोल विभाग आयोजित तर जर *भूगोल दिन* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी पोस्टर्स स्पर्धेचे व व्याख्यान चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. आर आर अत्तरदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते . तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. नंदिनी वाघ हे होते . *भूगोल दिन* या विषयी माहिती देत असताना भूगोल विषयाचे महत्त्व, जैवविविधता , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रोजगाराच्या संधी आणि पर्यावरण इत्यादी विषयांची माहिती दिली. मानवी भूगोलात ऐतिहासिक भूगोल, सांस्कृतिक व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, आर्थिक व राजकीय भूगोलाचा समावेश होतो
प्रादेशिक भूगोलात पर्यावरणाचे व्यवस्थापन आणि विविध संसाधन स्तोत्रांचे जनन व संवर्धन यांचा समावेश होतो. भूगोलाच्या सखोल सविस्तर अभ्यासात विविध पद्धतींचा समावेश केला जातो. प्रत्यक्ष क्षेत्र निरीक्षण, नकाशे यांना तर भूगोलात महत्वाचे स्थान आहेच पण आजकाल दुरसंवेदी कृत्रिम उपग्रह, ड्रोन कॅमेरे, हवाई चित्रीकरण यांनी भूगोलाच्या निरिक्षण क्षमतेत भर घातली आहे.
मानवी जीवनात भूगोलाचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपण जगतो ते जग त्याचे स्वरूप, विविध भूप्रदेश, देश, तेथील लोकजीवन यांचे ज्ञान आपल्याला भूगोलामुळेच होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय चे प्राचार्य प्रो. आर आर अत्तरदे यांनी आपल्या मनोगतात पर्यावरण जनजागृती, आज भूगोल विषयांमध्ये झालेले बदल या विषयी माहिती दिली . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि प्रास्ताविक व आभार प्रा. अजय पाटील यांनी मानले . या कार्यक्रमासाठी प्राध्यापक , शिक्षकेत्तर बांधव विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
