चोपडा वीज वितरण कंपनी कडून 83 वीज मीटर जप्त ; जवळपास 3,32,0000 रुपये दंड .!
चोपडा,दि.२० (प्रतिनिधी )-- चोपडा शहरात मेन रोड व काही कॉलनी परिसरात वीज वितरण कंपनी अचानक धाडीत 83 वीज मीटर जप्त करण्यात आले.यामुळे वीज मीटर मध्ये छेडछाड कारणाऱ्याचे धाबे दणाणले आहे
सविस्तर असे की, चोपडा वीज वितरण कंपनीच्या 18 अधिकारी व कर्मचारीचे पथक तयार करण्यात आले होते. ह्या पथकाने शहरात मेन रोडावर तपासणी केली असता अनेक वीज मिटर मध्ये छेडछाड केलेली आढळून आली वीज धारकांनी हेराफेरी केल्याचे आढळून आले त्यामुळे वीज वितरण कंपनीचे पथकाने धडक कारवाई करत कक्ष 1 आणि कक्ष 2 मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केली असता 83 मीटर जप्त करण्यात आले असून या ग्राहकांनी दंडाची रक्कम भरली नाही तर त्या ग्राहकावर गुन्हा दाखल करण्यात येईल असेही वीज वितरण कंपनी कडून सांगण्यात आले हे जप्त केलेले वीज मीटर तपासणी साठी धरणगाव येथे पाठविण्यात आले आहे. या 83 वीज मीटर धारकाकडून जवळपास 3,32,0000 रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात येणार आहे
या पथकात धरणगावचे कार्यकारी अभियंता शैलेश सोनागिरे, अतिरिक्त कार्य.अभियंता श्री जोगी, देवेंद्र चौधरी,चोपड्याचे उपकार्यकरी अभियंता एम.आर.साळूखे,सहाय्यक अभियंता आशिष गायकवाड, सह अनेक कर्मचारी या पथकात सामील होते. वीज वितरण कंपनी कडून असे ही सांगण्यात आले की, संपूर्ण चोपडा तालुक्यात वीज वितरण कंपनीचे धाड सत्र सुरूच ठेवणार आहोत. वीज चोरी थाबविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे. ही मोहीम अशीच सुरू ठेवण्यात येणार आहे. यामुळे वीजचोरी करणाऱ्या मध्ये घबराट निर्माण झाली आहे.
