चोपडा नगरपरिषद व श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने प्लास्टिक बंदी व पर्यावरण वाचवा या विषयावर भव्य रॅलीचे आयोजन

 चोपडा नगरपरिषद व श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने प्लास्टिक बंदी व पर्यावरण वाचवा या विषयावर भव्य रॅलीचे आयोजन

चोपडा दि.२४(प्रतिनिधी)श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन कॉलेज व चोपडा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने प्लास्टिक बंदी व पर्यावरण वाचवा या विषयावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्लास्टीक बंदी व पर्यावरण वाचवा या भव्य रॅलीचे आयोजन हे प्राध्यापक श्री.व्हि.एम.बोरसे व चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.राहुल पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होती. 

या रॅलीचा रुट हा श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोल मंदिर परिसर, आशा टॉकीज, फिल्ट्रेशन प्लांट याप्रमाणे रॅलीचा रूट होता. या रॅली द्वारे नागरिकांना संदेश देण्यात आला की प्लास्टिक बंदी करणे ही वसुंधरेला वाचवण्यासाठी किती महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिक बंदी ही झाली पाहिजे याचा अट्टहास नागरिकांनी धरला पाहिजे याकरिता प्रत्येक नागरिकांनी प्लास्टिक कॅरीबॅग चा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा. त्याचप्रमाणे एकल वापर प्लास्टिकचा वापर बंद करून लग्न समारंभ व इतर समारंभ याठिकाणी होणारा एकल वापर प्लास्टीक याचा वापर न करता सर्व ठिकाणी पुनर्वापर करता येणारे प्लास्टिक त्याचप्रमाणे धातु भांड्यांचा वापर करून समारंभ पार पाडावे. या सर्व वरील बाबी केल्यामुळे आपण आपल्या वसुंधरेला वाचवू शकतो आणि दैनंदिन पर्यावरणाचा होणारा रास हा आपण टाळू शकतो. “चोपडा नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी राहुल पाटील  यांनी नागरिकांना जाहीर आवाहन केलेले आहे की, शहरांमध्ये प्लास्टीक कॅरीबॅगचा वापर न करता जास्तीत जास्त कापडी पिशवीचा वापर करण्यात यावा. तसेच लग्न समारंभ, इतर समारंभ इ. मध्ये एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळावा व याकरिता चोपडा नगरपरिषदेस सहकार्य करावे.” शहरांमध्ये विविध अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये माजी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण या अभियाना अंतर्गत प्लास्टिक बंदी, पर्यावरण वाचवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पॅनल याबाबतचा वापर याबाबतची जनजागृती देखील रॅलीमध्ये करण्यात आली होती. रॅलीमध्ये सुमारे 600 विद्यार्थी, नगरपरिषद कर्मचारी, कॉलेजचे प्राध्यापक इतर कर्मचारी यांचा समावेश होता.

या मोहिमेत उपमुख्याकारी श्री.संजय मिसर, कर अधिकारी श्री.संदिप गायकवाड, स्वच्छता निरीक्षक श्रीमती दिपाली साळुंके, श्री.जयेश भोंगे, शहर समन्वयक स्वप्निल धनगर यांनी सदर रॅलीसाठी परिश्रम घेतले. या कार्याक्रमास अंत.लेखापरिक्षक चेतन गडकर, संगणक अभियंता अंकुश पाटील, लिपिक श्री.जयंत कपले, व मुकादम, मदतनीस हे सहभागी झाले होते. 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने